Advertisement

कन्हान येथे बहुरूपीय कला महोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रम‌‌ संपन्न | Multiform art festival and felicitation program concluded at Kanhan

कन्हान येथे बहुरूपीय कला महोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रम‌‌ संपन्न 

कन्हान : - विदर्भ शाहीर कलाकार परिषद व मानव शांती सांस्कृतिक प्रतिष्ठान , कन्हान च्या वतीने बहुरूपीय कला महोत्सव व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार (दि.२९) सप्टेंबर रोजी केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांच्या वतीने कुलदीप मंगल कार्यालय येथे करण्यात आले. कार्यक्रम सकाळी नऊ ते पाच वाजता पर्यंत लोक कलावंतांच्या भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.


या सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात ३७० मंडळांनी सहभाग घेतला व त्यामध्ये भजन , कीर्तन , दंडार , भारुड , खडी गंमत , भीम गीते , आदिवासी नृत्य सादरीकरण करण्यात आले . कलाकारांनी कन्हान नगरित दिंडी यात्रा काढून लोकांच्या मनात लोककलेच्या प्रचार व प्रसार व्हावा या माध्यमातून सांगण्यात आले . दिंडी यात्रा शहरात लोकांमध्ये आकर्षनाचे मुख्य कारण होते . संपूर्ण विदर्भ शाहीर कलाकारांनी व पदाधिकाऱ्यांनी खासदार‌‌ बर्वे यांचे स्वागत केले .  यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना कलावंतांच्या समस्या बद्दल निवेदन दिले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे , प्रमुख उपस्थिती माजी मंत्री राजेंद्र मुळक , नरेश बर्वे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपूर , शंकर चहांदे माजी सदस्य जिल्हा परिषद नागपूर , मनीष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान , केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुने , दयाळ कांबळे , अध्यक्ष नागपूर जिल्हा , अरुण वाहने , सरचिटणीस नागपूर जिल्हा ग्रामीण , विदर्भ संघटक प्रमुख , महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे , प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे , अशोक लोणारे , संगीत भक् ते , जिल्हा महिला प्रतिनिधी युवराज मेश्राम पत्रकार विदर्भ प्रसिद्धीप्रमुख , इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन , दीप प्रज्वलित करून, अभिवादन करण्यात आले . यावेळी रामटेक , तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार शाहीर प्रदीप कडबे‌ व‌ पत्रकार मोतीराम रहाटे, सुनील सरोदे , कमल यादव , आकाश पंडितकर  यांना पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . सर्वश्री शाहीर , विजय चकोले , शाहीर रवींद्र दुपारे , प्रबोधनकार सुभाष कोठारे , सोनाली गोंडाणे , ज्ञानेश्वर तायवडे , शाहीर मारोती मेश्राम , शाहिरा आर्या , गायक राहुल दादा उपस्थित होते .‌‌ यावेळी 

युवराज मेश्राम , संजय खांडेकर , शाहीर रवींद्र मेश्राम , शाहीर गणेश मेश्राम , शाहीर चुडामन लांजेवार , अशोक लोणारे , गायिका जोशना मेश्राम , गायिका वर्षा शेंडे , शाहीर रमेश रामटेके , शाहीर प्रदीप कडबे , दीक्षा चव्हाण , कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनीष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष , केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुने , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाहने , तर आभार प्रदर्शन दयाळ कांबळे यांनी केले . कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या