कोंबड्याचा झुंजीवर जुगार खेळणाऱ्या इसमावर कारवाई
तीन दुचाकी वाहना सह एकुण २,११,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा हिवरा येथे रेल्वे लाईनचे बाजुला पांधन रोडवर सुरु असलेल्या कोंबड्याचा झुंजीवर जुगार अड्यावर पोलीसांनी धाड मारुन एका इसमाला अटक करुन त्याचा जवळुन तीन दुचाकी वाहना सह २,११,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२३) आॅक्टोंबर ला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कन्हान उपविभागात प्रोव्हीशन जुगार रेड कामी फिरत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि मौजा हिवरा येथे रेल्वे लाईनचे बाजुला पांधन रोडवर काही इसम कोंबड्याचा झुंजीवर पैशाची बाजी लाऊन हातजीतचा जुगार खेळत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टाफ मौजा हिवरा रेल्वे लाईन जवळ पोहचली असता दुरुन काही इसम एकत्र होऊन कोंबड्याची झुंज खेळतांना दिसुन आले .
लपतछपत पोलीस त्यांचा कडे जात असतांना पोलीसांना पाहुण काही इसम आपले वाहन सोडुन पळु लागले . पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता एक इसम हातात दोन प्लाॅस्टीक ची थैली घेऊन पळतांना दिसला . त्यास पकडुन नाव विचारले असता त्यांने आपले नाव महादेव फागुजी मारबते (वय ५५) रा.सिल्लेवाडा असे सांगितले . पोलीसांनी हातात असलेल्या दोन्ही थैलाची पाहणी केली असता दोन जिवंत कोंबडे किंमत १००० रु व एक जख्मी कोंबडा किंमत २०० रु मिळुन आले .
पोलीसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता झुंज लावल्याचे नगदी ५,५०० रुपए मिळुन आले असुन घटनास्थळा वर काळ्या रंगाची होंडा लियो दुचाकी वाहन क्रमांक १) एम एच ४९ सिजे ३५७८ किंमत ९०,००० रु , २) ग्रे रंगाची टिव्हीएस ज्युपीटर मोपेड क्रमांक एम एच ४९ बिक्यु ३५४८ किंमत ६५,००० रु , ३) स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ एन ३८४४ किंमत ५०,००० रु मिळुन आल्याने पंचासमक्ष ई साक्ष प्रणाली द्वारे जप्त करण्यात आली .
जख्मी कोबडा आणि दोन जीवंत कोबड्यांचा लिलाव करण्यात आला असता नरसाळा गावातील मोहन डोमाजी ठाकरे(वय ४०) रा. नरसाळा यांना १००० रु. दोन्ही कोबडे आणि एक जख्मी कोंबडा २०० रु पंचासमक्ष देण्यात आले . त्यांचे कडुन प्राप्त नगदी १२०० रु , तीन दुचाकी वाहन किंमत २,०५,००० रु , नगदी ५,५०० रु असा एकुण २,११,७०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला . सदर प्रकरणा बाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी आरोपी महादेव फागुजी मारबते यास अटक करुन त्याचा विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
Action against Isma gambling on cockfights
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या