जुना गोंडेगाव येथुन ६८,९२५ रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
सुगंधित तंबाखु आणि कार सह एकुण २,१८,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान पोलीस डी.बी पथक पोलीसांची कारवाई
कान्हन : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुना गोंडेगाव येथुन पोलीसांच्या डी.बी पथकाने अल्टो कार मधुन ६८,९२५ रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला . कारवाईत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सुगंधित तंबाखू आणि कार सहीत एकुण २,१८,९२५रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार (दि.४) सप्टेंबर सायंकाळी साडे सहा वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस डी.बी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि जुना गोंडेगाव येथे एका इसमाच्या घरा समोर उभी असलेल्या कारमध्ये बाॅक्स व बोरी मध्ये संशईत सुगंधित तंबाखु दिसुन येत आहे .
अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन आरोपीला नाव विचारले असता त्याने आपले नाव रमेश सखाराम नेवारे (वय ३८) रा.जुना गोंडेगाव असे सांगितल्याने पोलीसांनी त्याचा घरासमोर उभी असलेल्या अल्टो कार क्रमांक एम एच ४९ बी ६७६६ ची झडती घेतली असता पोलीसांना मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखुचा साठा मिळुन आला.
पोलीसांनी सुगंधित तंबाखु किंमत ६८,९२५ रु आणि कार किंमत १,५०,००० असा एकुण २,१८,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन रमेश नेवारे ला अटक करुन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे .
सदरची कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोदार व अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनी राहूल चव्हान, पोहवा हरीश सोनभदे , अमोल नांगरे , महेश बिसने , अश्विन गजभिये , पोशि आकाश शिरसाट , चालक पोहवा संदीप गेडाम सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
A stock of flavored tobacco worth Rs.68,925 seized from Juna Gondegaon | जुना गोंडेगाव येथुन सुगंधित तंबाखूचा जप्त |
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या