श्रध्दाभावाने दिला गणरायाला निरोप |
कन्हान : - कान्द्री येथील बाल गणेश उत्सव मंडळ वॉर्ड क्रमांक ४ शिवनगर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .
Farewell to Ganaraya with respect
शनिवार (दि.०७) सप्टेंबर रोजी विधिवत पूजा अर्चना करुन गणरायाचा मूर्तीची स्थापना करण्यात आली . दहा दिवसाचा या गणेशोत्सवा दरम्यान दररोज सकाळ संध्याकाळ आरती ,
विविध सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम मंडळाचा वतीने घेण्यात आले व बुधवार (दि.१८) सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीने जात गणरायाचा मूर्तीला बग्गीमध्ये बसवून भव्य रोषणाईने गावातून मिरवणूक काढून कन्हान नदीवर विसर्जना करिता नेले व भक्तिभावाने गणरायाला निरोप देऊन गणपत्ती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्यास सांगितले .
यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश झोडावणे , चंदू निखर , हरीश वर्मा , विनंजय चव्हाण , रामसेवक जैस्वाल , नाहीद सय्यद , सूरज वर्मा , नंदकिशोर सहानी , डब्ल्यू राजभर , सरवर पांडे , आशिष मसराम , शुभम केवट , बंटी परते सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या