Advertisement

गोंडेगाव उपक्षेत्र जंगल परिसरात बिबट्याचे दर्शन | Sighting of Leopard in Gondegaon sub area forest area


गोंडेगाव उपक्षेत्र जंगल परिसरात बिबट्याचे दर्शन |
Sighting of Leopard in Gondegaon sub area forest area

वेकोलि कर्मचाऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण

वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त लावावा स्थानिक नागरिकांची मागणी

कन्हान : - कन्हान शहरातील वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र जंगल परिसरात वेकोलि कर्मचाऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .

शनिवार (दि.२१) सप्टेंबर ला रात्री वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र परिसरात वेकोलि कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते . वेकोलि कर्मचाऱ्यांना जंगलात बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी बिबट्याला कैमेऱ्यात कैद केले . या पुर्वी देखील बिबट्याने जुनी कामठी आणि गाडेघाट गावात दशहत पसरविली होती . रात्रीच्या वेळी वेकोलि कर्मचाऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने कर्मचाऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या चर्चेतुन आता जोर धरु लागली आहे .

गोंडेगाव उपक्षेत्र जंगल परिसरात बिबट्याचे दर्शन | Leopard in Gondegaon sub area | wcl |

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या