Advertisement

योग बार मध्ये शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले | yog baar kanhan darode | Kanhan police nabbed five accused who robbed a yoga bar with weapons |

योग बार मध्ये शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले


Kanhan police nabbed five accused who robbed a yoga bar with weapons

डी.बी.पथकाने १२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन केली कारवाई

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री परिसरातील योग बार मध्ये धारदार शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्हान पोलीसांच्या डी.बी पथकाने १२ तासाच्या आत पकडुन लाॅकपबंद केले .

पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.३०) आॅगस्ट ला रात्री ९ वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे दिनदयाल रामदास बावनकुळे वय 50 वर्ष रा.निलज खंडाळा कन्हान हे काउंटर वर हजर असतांना पाच अज्ञात इसम आले . तीन इसमांनी बार मध्ये प्रवेश करुन काऊंटर वर डंड्याने व चाकुने मारून ठेवलेले ग्लास चे ट्रे फोडुन नुकसान केले . 

बार मालका च्या खिशातील १००० रुपए आणि रॉयल स्टॉगचे तीन पाईंट प्रत्येकी ५२० रुपए प्रमाणे एकुण १५६० रुपए व मॅजीक मोमेन्टची निप किंमत २८० रुपए बळजबरीने हिसकावुन घेतले . बारमध्ये तोडफोड करून पिण्याचा पाण्याचे १२ काचेचे ग्लास किंमत २७६ रुपए व शोकेशचा फायबर सिट किंमत १५,००० रुपए फोडले  . असा एकुण १५ ,२७६ रुपयाचे नुकसान करुन चाकु व दंडयाचा धाक दाखवून जिवाने मारण्याची धमकी देऊन इसम पळुन गेले . 

कन्हान पोलीसांनी दिनदयाल बावनकुळे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला . सदर घटना गांभीर्याने घेत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन  तपासाबाबत कन्हान पोलीसांच्या डी.बी.पथकाला मार्गदर्शन केले . डी.बी पथकाने सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे कळमना नागपुर येथे शोध घेतला असता तांत्रीक पध्दतीने व गुप्त बातमीच्या आधारे त्याचे ठिकाण शोधून चपळाईने नशेतधुत असलेले आरोपी मयूर विष्णू बोरकर (वय २१) शैलेश कन्हैया नागपुरे (वय २१) स्वप्निल गजानन तेलमासरे (वय २३) अब्दुल रहमान वर्ल्द अब्दुल रज्जाक शहा (वय ३४) सर्व राहणार नागपुर व अभिषेक अरविंद गोंडाने (वय २५) रा. रामटेक यांना धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले . आरोपींना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली केल्याने पोलीसांनी अटक ची कारवाई करुन लाॅकपबंद केले .

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते , कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , हरिष सोनभद्रे , नरेश श्रावणकर , अमोल नागरे , महेश बिसेन , शैलेश वराडे , अश्विन गजभिए , आकाश सिरसाट , सुनील तेंलग , अजय भगत सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

योग बार मध्ये शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले | yog baar kanhan darode | Kanhan police nabbed five accused who robbed a yoga bar with weapons | Kanhan police nabbed five accused who robbed a yoga bar with weapons|  yog baar kanhan darode 30-Aug-2024|

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या