Advertisement

पुढच्या वर्षी लवकर या , जयघोषात संताजी नगरच्या राजाचे विसर्जन | Come early next year, ganpati bappa |


पुढच्या वर्षी लवकर या , जयघोषात संताजी नगरच्या राजाचे विसर्जन


 कन्हान :- कांद्री येथील संताजी नगरच्या राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले . गेल्या दहा वर्षांपासून संताजी नगरमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा केला जातो .  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थी च्या दिवशी शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली . या गणेशोत्सवा दरम्यान भाविक गणेशभक्तांनी दररोज सकाळ - संध्याकाळ आरती केली . रक्तदान शिबिर , मटके फोडणे , संगीत खुर्ची , होम मिनिस्टर , लहान मुलांचे ध्वनिमुद्रण नृत्य , रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सोमवार ला भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समस्त संताजी नगर वासीयांच्या उपस्थितीत भव्य महाआरती करण्यात आली . महामार्गा वरून मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुक काढुन गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोषात गणेशजींच्या मूर्तीचे कन्हान नदीत विसर्जन करुन दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली .



Come early next year, the immersion of the King of Santaji Nagar in cheers

यावेळी अतुल हजारे, प्रफुल्ल हजारे, तन्मय मेश्राम, अमर कुंभलकर, भगवान मस्के, अप्पी सैनी, सतीश झलके, मनोज वाडे, गणेश शर्मा, पियुष राजनकर, कैलास काकडे, राजेश शिंगणे, संजय लाडगे, दिनेश खाडे, हरी यादव, शुभम यादव आदी उपस्थित होते. यादव, मेहुल शुक्ला, ओम हजारे, पुरुषोत्तम काकडे, नंदू बारई, पंकज गुरव, निखिल हजारे, चंदू ठाकरे, पवन मेश्राम, अरुणा हजारे, वंदना गडदे, रितू मस्के, मीरा कुंभलकर, राखी गभणे, सुषमा चावडे, , निशा ठाकरे, पोर्णिमा ठाकरे, आशा गुरव, रुपाली हजारे, पूजा हजारे, सुनीता सावरकर, सुनीता चटप आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Come early next year, the immersion of the King of Santaji Nagar in cheers

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या