श्री हनुमान शिव पंचायत मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव थाटात साजरा |
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा | 2024 | shree krushn jnmashtami harshulhasat sajari |
पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी दिली भेट देऊन केली पुजा अर्चना.
कन्हान : - कन्हान शहरातील गांधी चौक येथे श्री हनुमान शिव पंचायत मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
सोमवार (दि.२६) ऑगस्ट ला रात्री श्रीकृष्ण मुर्तिची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली . पाळणा हालवुन , केक कापुन, फटाके फोडुन धार्मिक कार्यक्रमासह श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची सुरूवात करण्यात आली . मंगळवार (दि.२७) ऑगस्ट ला सायंकाळी ७ वाजता श्रीकृष्णा चे भजन कीर्तन व आरती आणि महाप्रसाद वितरण करुन श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
या महोत्सवात पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी भेट देऊन पुजा अर्चना करून उपस्थित भाविकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री हनुमान शिव पंचायत मंदिर पंच कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव , सचिव लहुजी तिवारी , नंदलाल यादव , विनोद यादव , सुजल यादव , बंटी यादव , शिव यादव , ओम यादव , आनंद शर्मा , अमन यादव , मोहित यादव , सुधीर लोंढे , अभिषेक यादव , उदीप चर्तुवेदी सह भक्तांनी सहकार्य केले .
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा | 2024 | shree krushn jnmashtami harshulhasat sajari |
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या