कन्हान पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राचा शुभारंभ | kanhan madhye mahila sampudeshan kendrache shubharambha | kanhan police station |
महिला समुपदेशन केंद्र च्या अध्यक्षा सौ.शितलताई चौधरी यांचा प्रयत्नांना यश
कन्हान पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राचा शुभारंभ | kanhan madhye mahila sampudeshan kendrache shubharambha | kanhan police station |
कन्हान :- कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात मुलींवर अत्याचार , बलात्काराच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पती-पत्नी घरगुती वाद विवाद, मारझोड चे तक्रार वांरवार कन्हान पोलीस स्टेशन मध्ये होत असल्याने कन्हान शहरात महिला समुपदेशन केंद्र गरजेचे होते. कन्हान शहरातुन खापरखेड़ा , कामठी, सह आदि महिला समुपदेशन केंद्रत महिलांचा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असुन महिलांना येण्याजाण्या करिता त्रास होत असल्याने महिला समुपदेशन केंद्र च्या अध्यक्षा सौ.शितलताई चौधरी यांनी पुढाकार घेत त्यांचा प्रयत्नाने कन्हान पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले .
सोमवार दि.२६ आॅगस्ट ला कन्हान पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्राचे शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि महिला समुपदेशन केंद्र च्या अध्यक्षा सौ.शितलताई चौधरी यांचा हस्ते करण्यात आले. महिलांना समाजात समान हक्क व संधी उपलब्ध होऊन हिंसाविरहित असे शांततापूर्ण जीवन जगण्याची संधी त्यांना त्यामुळे उपलब्ध होणार आहे.
महिलांचा आत्मविश्वास जागृत व्हावा, त्यांच्या प्रतिष्ठेची त्यांना जाणीव व्हावी असा प्रयत्न या केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे. महिलांवर हिंसाचार होत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांना पोलीसांचे सहकार्य मिळवून देणे. त्यांना समुपदेशन करणे, कायदेशीर मदत उपलब्ध करुन देणे या बरोबरच महिला आणि बालके यांच्यासाठी असलेल्या संस्था व पोलीस यांच्यामधील दुवा म्हणून ही केंद्रे काम करणार आहेत . महिलांवरील अत्याचार विरोधात या केंद्रामार्फत समाजात जनजागृती करण्यात येणार आहे असे मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांनी सांगितले. प्रसंगी संध्याताई रायबोले, भीमाताई बोरकर, अर्चना राव, छाया मेश्राम,उषा बवेकर, सुनीता आगाशे सह आदि महिला पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .
kanhan madhye mahila sampudeshan kendrache shubharambha | sampudeshan kendra kanhan |
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या