Advertisement

आंगनवाडी येथे दहीहंडी उत्सव थाटात साजरा | anganwadi yethe dahindi utsav thatat sampnna |


आंगनवाडी येथे दहीहंडी उत्सव थाटात साजरा | anganwadi yethe dahindi utsav thatat sampnna

कन्हान : - कन्हान शहरातील पिपरी ढिवरपुरा परिसरात आंगनवाड़ी क्रमांक १२६ सुनीता मानकर यांचा कडे दहिहंडी फोडुन श्री कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम थाटात पार पाडला.

कार्यक्रमा मध्ये विद्यार्थी वेदांत पानतावणे याने श्रीकृष्ण यांची वेशभूषा व विदिशा पानतावणे, आरोही मेश्राम, प्रीती उके, आर्वी मोहबे यांनी राधा यांची वेशभूषा घालुन सहभागी झाले होते. श्रीकृष्ण फोटो चे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विद्यार्थांनी नृत्य सादर करुन मटकी फोडुन दहीहंडी चा आनंद घेतला.

वेशभुषा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. परमेश्वर ला मिठाई अर्पण केल्यांनंतर मुलांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी  मोठ्या संख्येने कार्यक्रमात विद्यार्थांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या