Advertisement

कन्हान येथे वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी


कन्हान येथे वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी 

कन्हान : - कन्हान शहरातील पिपरी येथे लोधी समाजा द्वारे  वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

शुक्रवार (दि.१६) आॅगस्ट ला वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांची जयंती निमित्त पिपरी परिसरात लोधी समाजा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . रानी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . जेष्ठ नागरिकांनी रानी अवंतीबाई लोधी यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . 

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी रानी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करीत वीरांगना रानी अवंतीबाई लोधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . या प्रसंगी लोकेश दमाहे , किरण ठाकुर , ओमप्रकाश निंबोने , भगवान निंबोने , अमर रचोरे ,  प्रकाश नागपुरे , ऋषभ बावनकर , जीवनलाल लिलहरे , मोहित वतेकर , शेखर रनगिरे , राजेश बोपुलकर , हिरेंद्र रनगिरे , रोशन खंगारे , मनोहर कुंवामनोरे , रवींद्र बघेले , पवन मसखरे , प्रवीण टिकम , माहेर इंचुलकर , सुजल यादव , सह आदि नागरिक उपस्थित होते.

The birth anniversary of Veerangana Rani Avantibai Lodhi was celebrated with enthusiasm at Kanhan


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या