ओतूर येथील कपदिॅकेश्रर मंदिर येथे मोठी यात्रा | Long trip to Kapdikesrar temple at Otur
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील कपदिॅकेश्रर मंदिर येथे श्रावणी सोमवार असल्याने मोठी यात्रा भरली असून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे दरवर्षी कपदिॅकेश्रर मंदिर येथे यात्रा भरते ही यात्रा.महीनाभर चालत असल्याने ही यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात या मंदिरात तांदूळाच्या पिंडी बघण्यासाठी मोठ मोठ्या रांगा बघायला मिळतात या यात्रेत कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती.
मदिराच्या चारही बाजूने शंकर महादेव यांच्या पिंडी असून भाविकांच्या गर्दीने मदिर फुलून गेले होते.पाचव्या सोमवारी फार मोठी गर्दी होते असे जानकार मंडळी सांगतात येथे पाळणे खेळणी घरगुती सामन कपडे हाॅटेल यांची दुकाने लागली असल्याने यात्रेत ओतूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.ही यात्रा अजून एक आठवडा असून भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन ओतूर ग्रामस्थांनी केला आहे.
राजेश भांगे मुरबाड
0 टिप्पण्या