Advertisement

किरात किराड़ समाज बांधवांचा भुजेलिया स्नेह मिलन कार्यक्रम थाटात संपन्न | Kirat Kirad Samaj Bandhwancha Bhujelia love meeting program concluded at Thatat


किरात किराड़ समाज बांधवांचा भुजेलिया स्नेह मिलन कार्यक्रम थाटात संपन्न | Kirat Kirad Samaj Bandhwancha Bhujelia love meeting program concluded at Thatat

कन्हान : - कन्हान - पिपरी शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हिन्दी भाषीक किरात किराड़ समाजबांधवांच्या वतीने भुजेलिया स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

तुकाराम मंदिर , तुकाराम नगर , कन्हान येथुन महीला मंडळी मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेत , एकामेकाला शुभेच्छा देत हातामध्ये भुजेलिया घेऊन संगीतमय वातावरणात गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन परिसरातून भ्रमण करीत समाजबांधवांना प्रेमाचा व एकतेचा संदेश दिला. 

सर्वांनी एक दुसऱ्यांना भुजलिया देऊन लहान मोठ्यांच्या आशीर्वाद घेतला . यावेळी भुजलिया निमित्ताने डोणेकर सभागृहात का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी दहावी बारावी मध्ये समाजातील मुलांनी चांगले गुण घेतल्याने त्यांच्या सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या समोरच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विशाल बरगटे , अशोक झाळे , उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक नत्थु नानवरे , तर संचालन ज्ञानेश्वर दारोडे यांनी केले तर आभार संजय मोहने यांनी केले . यावेळी नरेश गड़े , मोतीलाल हारोड़े , रामराल लुहुरे , अशोक खंडाइत , राजेंद्र काठोके , नितेश लुहूरे , दुर्योधन मोहने , अंकुश , अन्नाजी लुहूरे , बादुले , मनीष डडूरे , दीपक हारोडे , सुधीर गड़े , माधव काठोके , आकांशा दारोड़े , सीमा लुहुरे , स्वाति दारोड़े , सचिन लुहूरे सह आदि समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या