भारत बंद ला कन्हान - कांद्री व्यापारांकडुन उत्फुर्त प्रसिसाद
सर्वोच्च न्यायालय निर्णयाच्या निषेधार्थ कन्हान - कांद्री बंद
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय तात्काळ मागे घेण्याची संविधान बचाओ संघर्ष समिति कन्हान - कांद्री ची मागणी
कन्हान : - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समिति सह विविध दलित संघटनांनी बुधवार दिनांक २१ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या भारत बंदची हाक ला
संविधान बचाओ संघर्ष समिति कन्हान - कांद्री द्वारे जाहिर समर्थन दिल्याने शहरातील विविध सामाजिक संघटन आणि व्यापारी दुकानदार बांधवा कडुन उत्फुर्त प्रसिसाद मिळाला .
Kanhan for India bandh - Enthusiastic praise from Kandri businessmen
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना एससी - एसटी आरक्षणात क्रिमी लेयर बनवण्याची परवानगी दिली आहे . ज्याला खरंच त्याची गरज आहे , त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी . त्यासाठी सब - कॅटेगरी बनवण्याचं कोर्टाने सांगितलं आहे . न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला .
त्याच विरोधात आरक्षण बचाव संघर्ष समिति द्वारे २१ आॅगस्ट ला भारत बंदची हाक दिली होती . सर्वोच्च न्यायालयाने निर्णय मागे घेण्यासाठी संविधान बचाओ संघर्ष समिति कन्हान - कांद्री द्वारे बंद ला समर्थन करुन कन्हान शहरातील आंबेडकर चौक येथुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शैकडो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला .
मोर्च्यात सहभाग झालेल्या शैकडो नागरिकांनी सर्वोच्च न्यायालय , केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करुन आणि दुकानदारांना आपली दुकाने बंद करण्याचे आव्हान केल्याने दुकान बांधवांनी आप आपली दुकाने बंद करुन उत्फुर्त प्रसिसाद दिला. मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करुन आंबेडकर चौक येथे मोर्चाचे समापन करण्यात आले .
आंदोलन वेळी कुठलाही प्रकारचा दंगा फसाद होऊ नये म्हणुन दंगा नियंत्रण पथका सह पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
Kanhan for India bandh - Enthusiastic praise from Kandri businessmen
भारत बंद ला कन्हान - कांद्री व्यापारांकडुन उत्फुर्त प्रसिसाद | Kanhan for India bandh - Enthusiastic praise from Kandri businessmen
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या