त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या : डॉ रेखा पाटील चव्हाण
बदलापूर येथील दोन निरागस चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करून फाशी देण्यात यावी यासाठी नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने महात्मा फुले पुतळ्या समोर निषेध व निदर्शने करण्यात आली.
बदलापूर येथील झालेल्या दोन निरागस चिमुकल्यावर झालेल्या अत्याचार संदर्भात जाहीर निषेध, आरोपीस तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अन्यथा आम्हा महिलांच्या ताब्यात द्या ..
बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे आज बदलापुरातील प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष निरंजन पावडे, डॉ. विश्वास कदम, दीपकसिंघ हजुरिया, व्ही.जे. वरवंटकर, नवनाथ कदम, शिवहारी गाढे, तानाजी शिंदे, दिपक कडेकर, रहिम खान, माणिक देशमुख, विष्णु पावडे, सुनंदा देशमुख, जेसिका शिंदे, इंजि. नसीम पठाण, बाळासाहेब देसाई, गजानन पावडे, ज्ञानेश्वर पावडे, नितीन देशमुख, बालाजी पावडे, शारुख, मारोती
प्रतिनिधी, तुकाराम चव्हाण-नांदेड
0 टिप्पण्या