Advertisement

कन्हान परिसरात ४,४४,६०० रुपयांची घरफोडी

कन्हान परिसरात ४,४४,६०० रुपयांची घरफोडी

सोना, चांदिचे दागिने व नगदी रुपए घेऊन आरोपी पसार, पोलीसात गुन्हा दाखल

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड नियर पानतावने काॅलेज जवळ असलेल्या बंद घरातुन चोरट्यांनी घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन सोना, चांदिचे दागिने व नगदी रुपए सह एकुण ४,४४,६०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.३१) डिसेंबर ला अनमोल शिखासन चव्हान, वय ३५, रा.कन्हान यांची पत्नी करिश्मा अनमोल चव्हाण ही मेयो रुग्णालय नागपूर येथे उपचार कामी भरती असल्याने अनमोल हा आपल्या घराला लॉक लाऊन सायंकाळी सहा वाजता दरम्यान मेयो रुग्णालय नागपूर येथे गेला होता. रात्री १ वाजता च्या दरम्यान अनमोल घरी परत आला तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडला दिसला.

अनमोल ने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता घरातील गोदरेज कंपनी ची अलमारी उघडली दिसली आणि त्या मध्ये ठेवलेले १) सोन्याचे लॉकेट १.४७० ग्राम, २) अंगुठी १.१० ग्राम, ३) टॉप्स २.०७० ग्राम, ४) अंगुठी ३ ग्राम, ५) चेन ६ ग्राम, ६) डोरली ३ ग्राम, ७) अंगुठी २.६७ ग्राम, ८) नथनी ०.१८ ग्राम, ९) अंगुठी १.८३ ग्राम, १० ) चेन ८५४ ग्राम, ११) लॉकेट ३.१४ ग्राम, १२) अंगुठी ३ ग्राम, १३) सुई धागा ५.३ ग्राम, १४) हापसेट कानाचे ३३.९७० ग्राम असा एकूण सोन्याचे दागीने ८५.६१ ग्राम किंमत ३,४२,४०० रुपए, चांदिचे दागीने ५५५ ग्राम किंमत २२,२०० रु व नगदी ८०,००० रु असा एकूण ४,४४,६०० रुपयांचा मुद्देमाल दिसुन आले नाही.

कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलुप तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे, चांदिचे दागिने व नगदी रुपए चोरुन नेल्याने पोलीसांनी अनमोल चव्हान यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक ३२४, कलम ४५७, ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

 

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या