पळसा येथे खासदार हेमंत पाटील यांच्या सहकार्याने महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन
पळसा-नांदेड:- दिनांक 16-1-2024 रोजी पळसा तालुका हदगाव येथे पार पडलेल्या महारोग्य मेळाव्यात एकूण ९५२ नागरिकांना वेगवेगळ्या आरोग्यसेवेचा लाभ देण्यात आला. यावेळी लायन्स क्लब हॉस्पिटल नांदेड आणि उपजिल्हा रुग्णालय हतगाव यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी, मोफत Ecg तपासणी, मोफत रक्ततपासणी, मोफत औषधी वाटप, मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी व वाटप करण्यात आले. खासदार हेमंत पाटील यांच्या सहकार्यातून झालेल्या या मेळाव्यातून ३५ रुग्णावर मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या मेळाव्यामध्ये उपस्थित असणाऱ्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवा यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातुन प्रकाशीत झालेल्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. याबरोबरच वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित शासकीय अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला गेला.
अनेक नागरिकाना रेशन कार्ड, संजय गांधी निराधार, दिव्यांग मानधन, आयुष्यमान गोल्डन कार्ड योजनेचा प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष संपर्क अधिकारी श्री.दादासाहेब थेटे या शिबिराच्या व्यवस्थिसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक श्री. ज्ञानेश्वर आधुडे तालुका गटविकास अधिकारी,आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
प्रतिनिधी: तुकाराम चव्हाण, गोर्लेगाव-नांदेड
0 टिप्पण्या