बनेरा येथे सौरऊजेचा खांब पळून मुलीला गंभीर दुखापत
लेले राऊंड आफिसर द्वारे अंजली भलावी ला आर्थिक मदत
पारशिवनी:- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील बनेरा हे गाव तालुक्या पासुन ४५ की.मी. अंतरावर असुन येथे सौरऊजेचे पोल ४ ते ५ वर्षा पासून लावलेले. असुन हे जीर्ण झाल्या मुळे अंजली रंजीत भलावी वय १७ वर्ष असुन हि मुलगी उन्हामध्ये बसली असता. सौर ऊर्जेचे पोल डोक्यावर पडले असल्यामुळे डोक्याला जबरदस्त जखम झाल्यामुळे नरहर येथिल डाक्टर कुडवेवाले यांच्या कडे नेण्यात आले. हि घटना दिनांक १४/१/२०२४ ला सकाळी ९:०० वाजेला घडली.
तेव्हा मुलींचे आई आणि वडील घरी होते म्हणुन मोठी घटना घडली. तेव्हा तालुका प्रतिनिधी यांना माहिती मिळताच तालुका प्रतिनिधी यांनी लेले राऊंड आफिसर यांच्या शी सम्पर्क केले असता त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा लेले यांना म्यासेज केलें तेव्हा लेले राऊंड आफिसर यांनी तालुका प्रतिनिधी यांना फोन केले. तेव्हा त्यांना माहिती देण्यात आली. तेव्हा त्यांनी मुलीच्या घरी जाऊन विचार पुस करुन मदत केली. पण वन समिती च्या अध्यक्ष आणि सचिव यांनी आतापर्यंत मुलीच्या घरी जाऊन विचार पुस केलेली नाही.
प्रतिनिधी: सतीश साकोरे-पारशिवनी
0 टिप्पण्या