Advertisement

पंकज चौधरी यांची बहुमतांनी उपसरपंच पदी निवड

पंकज चौधरी यांची बहुमतांनी उपसरपंच पदी निवड

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरडा येथे सन २०२३ ची सार्वत्रिक निवडणुक होऊन दि.२६ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.

यात युवा नेतृत्वाला संधी देत पंकज चौधरी यांना बहुमतांनी निवडून देण्यात आले आहे.

२०२३ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत युवाशक्ती ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय झाला होता.यात पंकज चौधरी यांच्यासह सहा तरुण उमेदवारांना भरघोस मतांनी गावकऱ्यांनी निवडून दिले होते.याच अनुषंगाने दि.२६ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली.यात पंकज चौधरी यांना बहुमत प्राप्त होऊन उपसरपंच पदी त्यांची निवड करण्यात आली.  बहुमतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे यावेळी त्यांनी मनःपूर्वक हार्दिक आभार मानले आहे.

प्रतिनिधी- हर्षपाल मेश्राम, रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या