बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर थाटात संपन्न | Cataract surgery camp concluded at Baliramji Dakhne High School Kanhan
२४० नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ, १३२ नागरिकांना चष्मे वितरण
कन्हान:- बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यध्यापक ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथि स्वामी राघवेंद्रजी महाराज, स्वामी ब्रह्ममयानंदजी महाराज, राम वाईकर, सह आदि मान्यवरांचा हस्ते स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन शिबीर कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांचा चमुच्या सहकार्याने एकुण २४० नागरिकांच्या डोळ्याची तपासणी केली.
यात १३२ नागरिकांना चष्मे वितरण व ३३ नागरिकांना दवाई वितरण करण्यात आले. तसेच मोतीबिंदु शस्त्रक्रिये करिता निवड झालेल्या ७५ रुग्णांची नेत्र शल्यचिकित्सा महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर येथे डोळ्याचे आॅपरेशन मोफत करण्यात येणार आहे. शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रास्ताविका शेंडे सर यांनी केले, सुत्र संचालन शिक्षिका भाग्यश्री नखाते आणि आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सचिन अल्हडवार यांनी केले.
शिबीराच्या यशस्वितेकरिता शिक्षक काटोके सर, थटेरे सर, डहारे सर, बेलनकर सर, ऊईके सर, धनविजय सर, चौधरी सर, बारई मॅडम, कोहळे मॅडम विद्यार्थी, विद्यार्थींनी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या