पाटबंधारे विभाग-पारशिवनी च्या भोंगळ कारभारामुळे एकाचा नहेर मध्ये पडुन मृत्यू
पारशिवनी:- एरीकेशन च्या चुकीच्या बांधकामांनी एकाचा क्यानल मध्ये पडुन मृत्यू झाला. मृतक हा घरचा कर्ताधरता असून आता त्याची मुल पोरकी झाली. आता त्यांचे संगोपन कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ह्या परिस्तिथीला फक्त आणि फक्त पाटबंधारे विभार जबाबदार आहे. असे नातलगांचे म्हणणे आहे. न्याय व हक्क मागण्यासाठी पाटबंधारे विभार-पारशिवनी यांना आर्थिक मदत आणि भविष्यात आहे प्रकार घडणार नाही ह्याची पाटबंधारे विभाग यांनी लक्ष ध्यावे.
मृतक हा नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथिल रहिवासी हिरामण जेठु वरखडे वय 45 वर्ष, पारशिवनी वार्ड क्रमांक 3 येथिल रहिवासी असून यांच्या मागे दोन मुलं आहे. हिरामण वरखडे हे कबाडीचा धंदा करुन मुलांचे पालन-पोषण करायचे.
दिनांक 24/Dec/2023 रोजी काळाने वेळ आनुन मुलांच्या डोक्यावरील छत हारपवले. त्यांच्या आईचे निधन आजार पणा मुळे मुलं लहान असतानीच झाले. यांची परिस्थिती हलाखीची असुन जलसंपदा विभाग शाखा अभियंता-पेंच पाटबंधारे शाखा पारशिवनी (१) चे अधिकारी दुपारे यांनी ताबडतोब यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी सतीश साकोरे आणि पारशिवनी तालुक्यातील जनतेने केलेली आहे.
जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आलेली आहे. पुढील कार्यवाही पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शना मध्ये अनिल चनदनबटवे करीत आहेत.
वितरीका नंबर ३ दिगलवाडी ते पारशिवनी जाणारया रोड वरील कयानलचया पुलावरती कटरे नसल्यामुळे ही जीवितहानी घडलेली असुन ताबडतोब पुलावरती कटरे बसवने आवश्यक आहे. होणारया जिवित हानीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील अशी ताकीत देण्यात आली.
प्रतिनिधी:- गौतम सावरकर पारशिवनी-नागपूर
0 टिप्पण्या