लहान मुलांच्या शाळांची भरण्याची वेळ बदला.पालकांनी केली मागणी
मुरबाड/ठाणे : 1 ते 4 वर्गाची लहान मुलांची झोप पुर्ण होण्यासाठी सकाळी भरत असलेल्या शाळाची वेळ बदलावी असी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
मुरबाड तालुक्यातील ईग्रजी माध्यमातील शाळेत जाणा-या लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शाळेंचे टाईमिंग 8 ते 8.30 वाजेचे असल्याने लहान मुलांना सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान उठावे लागत असल्याने ती मुल चिडचिडी झाल्याचे दिसून येत आहे. तरी हे टाईमिऺग 9:30 करावे अशी मागणी पालकांनी केली आहे.
सकाळी उठूनही मुले रात्री वेळेवर झोपत नाहीत.झोपलीतरी मध्यरात्री भुक लागल्याने म्हणा किंवा शारीरिक रात्र होत असल्याने झोपेतून जागी होतात व ती मुले पहाटे पच -सहा वाजेदरम्यान झोपतात.त्या मुळे त्यांना पुन्हा शाळेत जाण्यासाठी उठवावे लागत असल्याने ती मुले चिडचिडी व रडकी झाली असल्याची तक्रार मुलांची आई करत असल्याचे दिसून येते.
झोप पुरी न झाल्यामुळे व लहान वयात अभ्यासाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर असल्याने अनेक मुल शारीरिक आजारी असल्याचे दिसून येत आहेत. अनेक वेळा मुलाची आई त्या मुलाला रडतच स्कुल बस मध्ये बसवतानाचे चित्र दिसून येत आहेत, तर काही ठिकाणी वडीलांच्या रागवण्याची भिती लहान मुलांना सारखी असल्याने ती भयभीत झाल्याचेही दिसून येत आहेत.
शिक्षकांची संख्या न वाढविता दुपारचे सत्र सुरु ठेवण्यासाठी या लहान मुलांचे वर्ग सकाळी भरवले जात असल्याची कुजबूज पालकांमध्ये सुरु असते. शिक्षण विभागाने लहान मुलांना होणा-या त्रासाची दखल घेऊन संबधीत शाळांना सुचना करून लहान मुलांचे वर्ग योग्य वेळेत भरविण्यास सुचना द्याव्यात असी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
प्रतीनिशी: राजेश भांगे मुरबाड-ठाणे
0 टिप्पण्या