झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला
दोन तरुण गंभीर जख्मी, पाच आरोपी अटक
कन्हान :- कन्हान शहरातील अशोक नगर परिसरात भरदिवसा झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर असामाजिक तत्वांचा सहा इसमांनी चाकु, काठीने प्राणघातक हल्ला करुन दोन तरुणांना गंभीर जख्मी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे.
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२७) ला सकाळी १०:४० वाजता च्या दरम्यान जख्मी युवक सय्यद शाहरुख रेश्मा सय्यद वय २६ रा.कन्हान हा मित्र लक्की नाईक यांचा सोबत पिपरी गाडेघाट रोड वर सुनिल उमरकर यांचा सलुन च्या दुकाना शेजारी फुटपाथ वर बसुन बोलत असतांना दोन दुचाकी वाहना वर सहा लोक हातात चाकु, डंडे घेऊन आले.
आरोपी विशाल नामदेव चिंचुलकर वय ३६ रा.कन्हान याने लक्की नाईक ला विचारले कि तु काल मला मारायला आला होतास काय असे म्हणून लक्की ला शिवीगाळ करु लागला, तेव्हा आरोपी सुमेश भिमराव रामटेके वय ३१ रा.कन्हान याने जवळ च्या काठीने लक्की च्या मनघटावर माराहण करुन जख्मी केले.
शाहरुख झगडा सोडायला गेला असता विशाल याने शिवीगाळ करुन, तु मध्ये का येत आहेस, अगोदर तुलाच टपकोतोय असे म्हणून विशाल ने दोन ते तीन वेळा शाहरुख वर चाकुने वार केले परंतु शाहरुख ते वार हुकवुन पळुन जात असतांना विशाल ने शाहरुख च्या डाव्या बाजुच्या कमरेच्या खाली पायावर चाकुने मारुन जख्मी केले.
शाहरुख आपला जीव वाचविण्यासाठी पळत असतांना आरोपी सुमेश रामटेके, अविनाश सहारे, रितेश चावके, लक्की भेलावे आणि दोन अनोळखी इसमांनी काठीने दोन्ही पायावर माराहण केली.
त्यानंतर शाहरुख जीव वाचवुन सुनील उमरकर यांचा दुकानात घुसला असता आरोपींनी सलुन दुकानात घुसन काठीने दुकानाचे काच फोडले आणि समोर उभ्या असलेल्या एम एच ४० एच ७८१५ क्रमांका च्या दुचाकी वाहना ला काठीने हेडलाईट वर मारुन नुकसान केले.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी शाहरुख यांचा तक्रारी वरून पाच आरोपींना अटक करुन त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम हे करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या