विद्यार्थींना ४०गाद्या, पुस्तक, दैनिक वापर साहित्य वितरित करुन विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा | Students’ Day was celebrated enthusiastically by distributing 40 mattresses, books, daily use materials to the students
कन्हान – अंजनाबाई मतिमंद मुलामुलीची निवासी शाळा येथे आणि सर्वधर्म समभाव संघटना कन्हान द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत विद्यार्थींना ४० गाद्या, पुस्तक, दैनिक वापर साहित्य वितरित करुन विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासना च्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर’ हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला असून ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. एल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
अंजनाबाई मतिमंद मुला मुलीची निवासी शाळा येथील कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाघमारे, अतुल गजभिये, सुनील तेलंग, दिनेश ढोके, शैलेश माटे, टेकचंद वाघमारे, नेवालाल पात्रे, सुजित पानतावने यांच्या द्वारे
विद्यार्थ्यांसाठी ४० गाद्या व दैनिक वापर साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव संघटना कन्हान द्वारे गांधी चौक येथे संस्थापक अध्यक्ष चंदन मेश्राम यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये शाळेतील विद्यार्थींना बुक, पेन, पेंसिल वितरित करुन विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कैलास भिवगडे, हरीभाऊ वानखेडे, आर्यन मेश्राम, दिलिप निंबोने, अक्षय फुले, मुकेश गंगराज, अखिल शेडे शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या