Advertisement

शेतकरी बांधवांना प्रकल्पाची माहिती हरभरा बियाणे वाटप | Information about the project to farmers, distribution of gram seeds

शेतकरी बांधवांना प्रकल्पाची माहिती, हरभरा बियाणे वाटप | Information about the project to farmers, distribution of gram seeds

कन्हान:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान कडधान्य अंतर्गत बुधवार (दि.०८) नोव्हेंबर ला मौजा खंडाळा (घटाटे) येथे उपसरपंच चेतन कुंभककर यांचा शुभहस्ते शेतकरी बांधवांना हरभरा बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक विवेकानंद शिंदे यांनी शेतकरी बांधवांना प्रकल्पा विषयी माहिती दिली व पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करण्याबाबद मार्गदर्शन केले.

शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात ही एक रुपयातच पिक विमा काढण्याबाबद आव्हान केले. कार्यक्रमासाठी पटवारी फरहान शेख व कृषी मित्र प्रफुल भाऊ उपस्थित होते. या योजनेच्या लाभ‌ घेण्यासाठी शंकर वानखेडे, दिलीप हटवार, भाऊराव चौधरी, नितीन पानतावणे, बबन हटवार, ताराचंद नागपुरे, एकनाथ नागपुरे, विनायक हटवार, महादेव गावंडे, युवराज ठाकरे, सुनिल वानखेडे, अभिषेक भारद्वाज, प्रज्वल वानखेडे, मधुकर दिघळे, श्रीकांत वानखेडे, मारुती गावंडे, जनार्धन नागपुरे, राजेश हटवार, तेजराम कुंभलकर, संगीता वानखेडे, विनायक गुडदे, रजनीकांत वानखेडे, भोजराज कुंभलकर आदी शेतकरी बांधवाणी उपस्थित राहुन लाभ घेतला.

 

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या