हदगाव तालुका सरपंच संघटनेची कार्यकारिणी जाहीर
हदगाव / नांदेड :- अनेक दिवसापासून अनेक सरपंचांना काही अन्याय कारक गोष्टीचा सामना करावा लागतो. याचाच ऐक भाग म्हणून 6 नोव्हेंबर रोजी सरपंच संघटनेची बैठक पंचायत समिती हदगाव येथे आयोजित केली होती. यात अनेक सरपंचांनी आपले मत मांडताना अधिकाऱ्याच्या टक्केवारीवर नाराजी वेक्त केली.
तसेच काही ठिकाणी तर सरपंचाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामसेवक सर्व निधी हडप करतात. MRGS चे मस्टर काढण्यासाठी पाहिले पैसे मोजावे लागतात. पैसे मोजूनही मस्टर निघत नाहीत.
सरकारी आदेशानुसार प्रत्येक गावात स्वतंत्र दिनी फलक उभारले. हे सर्व खर्च सरपंचांनी खिशातून केले. पण अजून पैसे मिळाले नाही. यामुळे बऱ्याच सरपंच मंडळींनी नाराजी व्यक्त केली. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आपली ऐक संघटना असावी. या उद्देशाने बरेच सरपंच एकत्र येऊन ऐका सरपंच संघटनेची निर्मिती करण्यात आली.
यात अध्यक्ष म्हणून सीताराम पाटील फळीकर तर कार्यअध्यक्ष म्हणून निलेश पाटील अंबाळकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर नाईक, मल्हार सोळंके, रंजीत वाढवे, नारायण आमदरे, या चार जणांची निवड करण्यात आली.
तर सचिव म्हणून शरद चौरे, सहसचिव म्हणून रुपेश तंत्रे, संघटक म्हणून खंडोजी ढोके व हेमंत नरवाडे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून जयंत पाटील,राजेंद्र कदम, विलास व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली आणि कमिटीत अनेक सरपंचांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले.
प्रतिनिधी – तुकाराम चव्हाण, हदगाव पुढाकार समाचार 24 तास
0 टिप्पण्या