उदरात मृत गर्भ असल्याचे समजताच पतीवर गुन्हा दाखल | A case was registered against the husband as soon as he realized that there was a dead fetus in his stomach
कन्हान : – शहरातील रायनगर येथील रहिवासी सौ.आचल आकाश सोनावने (वय २३) वर्ष ही कांद्री येथे राहणारा आकाश सोनवाने याला शाळेपासुन ओळखत होती. आकाश सोबत प्रेम सबंध असल्याने त्यांचा सोबत रिती रिवाजाने (दि.२५) फरवरी २०२२ रोजी लग्न करून आकाश सोबत सासरी त्यांचा घरी राहत होती. लग्न होऊन दोन महिन्या नंतर आकाश हा दारु पिऊन नेहमी मारझोड करायचा. सासु संगीता सोनवाने व सासरे रमेश सोनवाने यांनी नेहमी मानसिक त्रास द्यायचे.
या दरम्यान सौ.आचल यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने पती आकाश याने डॉक्टर यांच्या कडे उपचारा करिता नेले तेव्हा डॉक्टरांनी तपासुन कमजोरी असून गर्भवती असल्याचे सांगितले. यावेळी पती आकाश आणि सासु संगिता यांना बाळ नको होते. त्यामुळे बाळ ठेवण्यावरून विरोध होता. या कारणांमुळे पती मारायचा तर सासू व सासरे झगडा भांडण करून शिवीगाळ करायचे.
सर्व प्रकार वडीलांना फोन करुन सांगितल्याने वडीलांनी माहेरी घेऊन आले. NGO नारीशक्ती संघर्ष समितीच्या मध्यस्थीने परत सासरी रहायला गेली. पती आणि सासु एक दोन दिवस चांगले राहिले व त्यानंतर पुन्हा हुंडा मागणी करीत दारु पिऊन मारपीट करून झगडा भांडण व शिवीगाळ करत होते. रविवार (दि.१०) सप्टेंबर रोजी आकाश याने हाॅस्पीटल कडे बाळ पाडायचा नेले असता डॉक्टारांने नकार दिला.
यावेळी आकाश याने फार्मेसी मधून गोळ्या आणल्या व त्याच दिवशी रात्री जबदस्तीने गोळ्या तीन दिवस दिल्या. काही दिवसाने गर्भात काहीच हालचाल जानवत नसल्याने अत्यंत रक्तस्राव देखील व्हायला लागला. त्यामुळे आई व वडीला सोबत शुक्रवार (दि.३) नोव्हेंबर रोजी हॉस्पीटल कामठी येथे सोनोग्राफी केली असता रिपोर्ट मध्ये उदरात ८ आठवडे ७ दिवसाचा मृत गर्भ असल्याचे सांगीतले.
यांतच प्रचंड रक्तस्राव होऊन गर्भ पडुन गेला. पती आकाश व सासू संगीता यांनी जबरजस्तीने मुलीच्या संमतीशिवाय गोळ्या खाऊन घालुन गर्भपात केला. यावरून आई – वडीलासोबत व आचल सोनवणे (ngo) नारी शक्ती संघर्ष समिती च्या अध्यक्षा संगीता वाढंरे व त्यांची टीम सोबत कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार केल्याने पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३१३, ४९८, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या