Advertisement

पारशिवनी तालुक्यात १७ गट ग्रामपंचसाठी ८६.०३ टक्के मतदान

पारशिवनी तालुक्यात १७ गट ग्रामपंचसाठी ८६.०३ टक्के मतदान

गरंडा येथे सर्वाधिक, तर बच्छेरा येथे सर्वात कमी मतदान

कन्हान:- पारशिवनी तालुक्यातील १७ गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक रविवार ला शांततेत पार पडले. गट ग्रामपंचायती चे १७ सरपंच पदासाठी ५५ तर १४१ सदस्य पदासाठी ३२९ उमेदवारांचे भाग्य ईवीएम मध्ये बंद झाले. या निवडणुकी मध्ये ५१ मतदान केंद्रात २१,४२२ पैकी १८,४२९ मतदारांनी आपला मतांचा हक्क बजावला. या मध्ये पुरुष मतदार ११२०२ पैकी ९७७२ मतदारांनी, तर महिला मतदार १०२२० पैकी ८६५७ मतदारांनी मतदान केले.

पारशिवनी तालुक्यातील सर्वाधिक मतदान गरंडा येथे सर्वाधिक मतदान झाले असुन बच्छेरा चारगाव येथे सर्वात कमी झाले. निवडणुकी दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन मतदान केंद्रावर आणि परिसरात पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. आज सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर ला पारशिवनी तहसील कार्यालय येथे मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती पारशिवनी तालुका निवडणुक अधिकारी रणजीत दुसावार, सहायक निवडणुक अधिकारी नायब तहसीलदार राजेराम आडे आणि प्रकाश हारगुडे यांनी दिली.

 

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या