नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार समारंभ
पारशिवनी: नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील सावळी येथे नवनिर्वाचित सरपंच महेश राऊत यांचा सत्कार समारंभ दिनांक ११/११/२०२३ ला आतीस बाजी मध्ये पार पडला. सरपंच महेश राऊत यांचा सत्कार समारंभ झाल्या नंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
चिंचोली,महादुला,साल ई, पारशिवनी आणि सावळी येथील गावकरी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेंद्र ठाकरे, प्रदिप दियेवार माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावरकर सावळी येथील माजी सरपंच, पोलीस पाटील आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महेश राऊत यांनी सांगितले की मी येणाऱ्या सर्व निधी मार्गी लाऊ येणाऱ्या सावळी ग्राम पंचायत अंतर्गत गावांचा पुर्ण विकास करुन, गावकऱ्यांच्या समस्या मी मार्गी लावणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले.
प्रतिनिधी: सतीश साकोरे, पारशिवनी
0 टिप्पण्या