Advertisement

दुचाकी ला धडक दिल्याचा वादातुन होमगार्ड पोलीसांच्या बेदम मारहाणी मुळे युवकाचा मृत्यु

दुचाकी ला धडक दिल्याचा वादातुन होमगार्ड पोलीसांच्या बेदम मारहाणी मुळे युवकाचा मृत्यु

आरोपी होमगार्ड शिपाई अटक , रामटेक गढमंदिर परिसरात घडली घटना

रामटेक : – रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत गडमंदिर परिसरात दुचाकी ला धडक दिल्याचा वादातुन होमगार्ड पोलीसांच्या बेदम मारहाणी मुळे युवकाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन पोलीसांनी आरोपी होमगार्ड शिपाई मनिष भारती याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

 

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.२५) नोव्हेंबर ला सायंकाळी ७:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी विश्वनाथ गोवर्धन खोब्रागडे वय ५१ वर्ष, रा.वार्ड क्रमांक ०२ सितापुर, (देवलापार) तहसील रामटेक, जिल्हा नागपुर यांचा मुलगा मृतक विवेक खोब्रागडे हा मित्र फैजान खान रा.पवनी याचा सोबत त्याच्या मोटार सायकल ने रामटेक येथे शोभायात्रे चा कार्यक्रम पाहण्याकरीता जात आहे असे सांगून घरून निघुन गेला. त्यानंतर विश्वनाथ हे आपल्या सेक्युरीटी चे कामावर निघुन गेले.

 

रविवार (दि.२६) नोव्हेंबर ला सकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान विश्वनाथ घरी कामावरुन परत येऊन दरवाजा ठोकल्याने विवेक ने दरवाजा उघडला असता विवेक थरथर कापत होता व लंगळत चालत होता. वडिलांनी विवेक ला विचारपुस केली असता तेव्हा विवेक ने सांगीतले की, काल रात्री मला रामटेक ला काही लोकांनी मारहान केली आहे. तेव्हा विवेक बरोबर बोलत नव्हता व उभा सुध्दा होत नव्हता.

वडिलांनी विवेक ला दवाखान्यात घेऊन जाण्याकरीता चार चाकी वाहन बोलाविली व विवेक ला दोन – तीन लोकांच्या सहाय्याने गाडीत बसवून डॉ.सुधिर नाकले रा. पवनी यांच्या दवाखान्यात उपचारकामी नेले असता त्यांनी प्रथम उपचार करुन विवेक चा वडिलांना सांगीतले की, ही सिरीयस केस आहे.

तुम्ही मुलाला कामठी येथील चौधरी हॉस्पीटल येथे उपचारा कामी घेवुन जा. वडिलांनी विवेक ला चारचाकी वाहनात टाकुन उपचार कामी कामठी ला चौधरी हॉस्पीटल येथे घेवुन गेले असता वाहना मध्येच तेथील डॉक्टरांनी मुलगा विवेक याला तपासुन मरण पावल्याचे सांगीतले.

वडिलांनी विवेक ला घेऊन घरी परत आले आणि विवेक याचा मित्र फैजान याला घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी व विकेक आम्ही दोघे ही शनिवार (दि.२५) नोव्हेंबर ला रात्री ८:३० वाजता च्या दरम्यान गडमंदिर रामटेक वरुन दुचाकी वाहना ने डब्बल सिट घरी परत येण्याकरीता निघालो असता गडमंदिर वरुन खाली उतरत असता आरोपी होमगार्ड शिपाई मनीष भारती रा.रामटेक या नावाचा इसमाने व त्याचा मित्रांनी दुचाकी वाहन थांबवुन तुमचा मोटार सायकल ने माझा मोटार सायकल ला ठोस मारून तुम्ही पळुन गेले असे म्हणुन शिविगाळी करून विवेक आणि फैजान खान याला हातबुक्काने व लाताबुक्कीने मारपीट केली. तसेच तुम्ही मुसलमान व महार जातीचे असल्यानंतर येथे कशाला आले, असे म्हणून धमकी दिली. काही वेळांने फैजान चा भाऊ आल्यानंतर मनिष भारती नावाचा इसमाने त्याचा गाडीचे नुकसान झाल्याचे सांगुन फैजान चा भावाकडुन १०,००० रुपए घेतले. फैजान व विवेक यांना गाडी चालवने होत नसल्याने व ते घाबरले असल्याने पोलीस स्टेशन रामटेक ला तक्रार देण्यासाठी न येता दोघेही फैजानचा भावाच्या गाडीने घरी परत आले असे सांगीतले.

 

शनिवार (दि.२५) नोव्हेंबर ला रात्री ८:३० वाजता च्या दरम्यान विश्वनाथ यांचा मुलगा विवेक खोब्रागडे हा त्याचा मित्र फैजान खान त्याचे सोबत गडमंदिर रामटेक वरुन मोटार सायकल ने डब्बल सिट घरी परत येत असतांना गड मंदीर रोडवर त्याला मनिष भारती व त्याचा मित्रांनी मुलगा विवेक व त्याचा मित्राची मोटार सायकल थांबवुन आमचा मोटार सायकल ला ठोस लागली असे म्हणुन हातबुक्कीने व लातबुक्किने मारहान केल्याने विश्वनाथ यांचा मुलगा विवेक हा मरण पावल्याने रामटेक पोलीसांनी फिर्यादी विश्वनाथ खोब्रागडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी मनीष भारती व त्यांचा मित्रांन विरुद्ध अप क्रमांक ८७७/२३ कलम ३०२, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४, ३,(२),(५) भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी मनीष भारती यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे हे करीत आहे.

 

पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण

 

दरवर्षी कार्तिक पौर्णिमा निमित्य रामटेक गडमंदिर परिसरात विविध कार्यक्रम होत असतात. परंपरा कायम असुन या वर्षी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शनिवार ला रात्री ८:३० वाजता च्या दरम्यान विवेक आणि फैजान हे दोघे ही गडमंदिर रामटेक वरुन मोटार सायकल ने डब्बल सिट घरी परत येत असतांना गड मंदीर रोडवर त्याला मनिष भारती व त्याचा मित्रांनी विवेक व फैजान याची दुचाकी वाहन थांबवुन आमचा दुचाकी वाहना ला ठोस लागली असे म्हणुन हातबुक्कीने व लातबुक्किने मारहान केली. या मारहाणीत विवेक याचा मृत्यु झाला असुन फैजान गंभीर जख्मी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारा करिता भर्ती केले आहे.

या घटनेने संपुर्ण रामटेक परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांचा चोख बंदोबस्त असतांना घटना घडली कशी ?, पोलीस अधिकारी, कर्मचारी कुठे तैनात करण्यात आले होते ?, गडमंदिर रोडावर पोलीस कर्मचारी घटना घडत असतांना होते कि नाही ? असे अनेक उलट सुलट प्रश्न निर्माण झाले असुन रामटेक पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले आहे. आरोपी मनीष भारती हा होमगार्ड शिपाई असल्याचे बोलले जात आहे. होमगार्ड शिपाई चा फायदा घेऊन युवकाला बेदम माराहण करण्याचा अधिकार कोणी दिला. असे अनेक होमगार्ड शिपाई आज ही आपल्या वर्दीचा दुरुपयोग करत आहे. आरोपी मनीष भारती यांचावर तात्काळ कारवाई करुन मृतकांचा परिवारांना न्याय देण्याची मागणी नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या