Advertisement

२२ ब्रास वाळुसह तीन ट्रक आणि एक टैक्टर जप्त

२२ ब्रास वाळुसह तीन ट्रक आणि एक टैक्टर जप्त

महसुल विभागाची कारवाई, ८ लाख ३७ हजार २४० रुपयांचा दंड वसुल

कन्हान – कन्हान शहरातील गहुहिवरा रोडवर तहसीलदार राजेश भांडारकर आणि महसुल विभागाच्या ग्रस्त पथकाने २२ ब्रास वाळु सह तीन ट्रक आणि एक टैक्टर जप्त करुन ८ लाख ३७ हजार २४० रुपयांचा दंड वसुल केल्याची माहिती राजेश भांडारकर यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.२६) नोव्हेंबर ला पहाटे च्या दरम्यान तहसीलदार राजेश भांडारकर आणि महसुल विभाग ग्रस्त पथक कन्हान परिसरात अवैध वाळु वाहतुक कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि गहुहिवरा रोड वरुन वाळु ने भरलेले तीन ट्रक वाहतुक करीत आहे.

अश्या माहिती वरुन तहसीलदार राजेश भांडारकर आणि महसुल विभाग ग्रस्त पथकाने सकाळी ७:०० वाजता च्या दरम्यान कन्हान शहरातील गहुहिवरा रोडवर कारवाई करत ट्रकची तपासणी केली असता ट्रक क्रमांक एम एच ४० सीएम ३३६१ आणि एम एच ४० सीएम ३५२७ मध्ये ८ – ८ ब्रास रेती व एम एच ४० सीएम ६८४५ मध्ये ५ ब्रास बॅगर्स राॅयल्टी वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले.

महसुल विभागाने कारवाई केल्यानंतर जप्त केलेले तीन ही ट्रक कन्हान पोलीसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच पारशिवनी येथे बॅगर क्रमांक असलेली ट्रैक्टर ट्राली वाहतुक करतांना पकडुन जप्त करण्यात आली. महसुल विभागाने एकुण २२ ब्रास रेती जप्त करुन चार वाहनांवर ८ लाख ३७ हजार २४० रुपयांचा दंड वसुल केल्याची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांनी दिली.

 

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या