व्हॉईस ऑफ मीडियाच्या मुरबाड तालुका कार्याध्यक्ष पदी पत्रकार राजेश भांगे यांची बिनविरोध निवड
मुरबाड:- व्हाँइस आँफ मिडिया मुरबाड तालुक्याच्या जि.प.शासकीय विश्राम ग्रुह तथा जुना डाक बंगला येथे, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत संघटनेच्या रिक्त असलेल्या कार्याध्यक्ष पदी जुने-जाणकार व अभ्यासु,झुंजार पत्रकार राजेश भांगे यांची सर्वानुमते मुरबाड तालुका कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
खरे तर आज मितीस संपूर्ण देशभरात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी,हे ब्रिद घेऊन तब्बल 37000,सदतीस हजार पत्रकारांची फौज घेऊन शासन दरबारी पत्रकारांसाठी लढणारी, अग्रगण्य व देशातील नंबर 1,चे नामांकन मिळवलेली संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया हि एकमेव पत्रकार संघटना
देशभरात सध्या पत्रकारांवरील वाढते हल्ले,पत्रकारांना मिळणारे तुटपुंजे मानधन, पत्रकाराना पेन्शन योजना,घरकुल योजना, अधिस्वीकृती, आरोग्य विमा, पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावी यासाठी जोमाने लढणारी संघटना असुन, अशा पत्रकार संघटनेची आज पत्रकारांना गरज आहे.
त्याशिवाय शासन दरबारी पत्रकारांचे विविध प्रश्र मागीॅ लागणार नाहीत. अशा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक-संदिपजी काळे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-अनिलजी म्हस्के,ठाणे जिल्हाध्यक्ष अरुण ठोबरे यांच्या सुचने नुसार मुरबाड तालुका अध्यक्ष मंगलजी डोंगरे,यांनी राजेश भांगे यांची तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
या वेळी संघटनेचे जिल्हा संघटक जयदीप अढाईगे व जिल्हा प्रतिनिधी श्याम राऊत, यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात केली आहे.या निवडीला तालुका मार्गदर्शक तथा सल्लागार जेष्ठ पत्रकार मुरलिधर (आण्णा) दळवी सुधीर भाऊ पोतदार, नंदकुमार मलबारी, यांच्या शुभेच्छा दिल्या असुन, यावेळी तालुका उपाध्यक्ष संदिप पष्टे, तालुका सचिव सचिन वाघचौडे, कोषाध्यक्ष अरूण ठाकरे, किशोर गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख-जीवन शिंदे, योगेश तेलवणे, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या