Advertisement

आमदार आशिष जैस्वाल रामटेक विधानसभा | यांच्या निधिमधुन करण्यात आले नयकुंड ते बखारी रोडच्या कामामध्ये मोठा भष्टाचार उघडकीस | MLA ashish jaiswaal Ramtek vidhansabha | yanchya nidhitun karnyat alelya | Naykund te Bakhari Road | Kamat motha | Bhrashtachar |

आमदार आशिष जैस्वाल रामटेक विधानसभा | यांच्या निधिमधुन करण्यात आले नयकुंड ते बखारी रोडच्या कामामध्ये मोठा भष्टाचार उघडकीस

 

आमदार आशिष जैस्वाल रामटेक विधानसभा | यांच्या निधिमधुन करण्यात आले नयकुंड ते बखारी रोडच्या कामामध्ये मोठा भष्टाचार उघडकीस | MLA ashish jaiswaal Ramtek vidhansabha | yanchya nidhitun karnyat alelya | Naykund te Bakhari Road | Kamat motha | Bhrashtachar |

पारशिवनी:- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयकुंड ते बखारी रोडचे काम आमदार आशिष जैस्वाल यांच्या निधिमधुन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) नागपूर यांनी हे काम डी.पी.डी.सी-५०५४ कार्यक्रमा अंतर्गत सन २०२२-२०२३ प्रस्तावित करुन मंजुर करून दिले कामाचे नाव डुमरी ते बखारी असुन ते (ग्रा.मा.९२) रस्त्यांची सुधारणा करणे तहसिल पारशिवनी जिल्हा नागपुर प्राकलन किंमत रुपये ५०.०० लक्ष असुन करारनामा क्रमांक -बि-१२८९डी.एल२०२२-२०२३ दिनांक १६/०३२०२३ ठेकेदारांचे नाव- मेसर्स सुकल्प कन्स्ट्रक्शन कंपनी,पवनी यांना दिले असून हे काम नियमानुसार झालेले नसुन, ठेकेदार आणि अधिकारी हे मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.

पण यामध्ये डुमरी ते बखारी असे दाखविले असुन हे काम नियमानुसार डुमरी ते बखारी झाले आहे. हे काम नायकुंड ते बखारी टी पाँइंट पर्यन्त झालेले आहे. रोड प्रत्येक जागेवरती उखरलेला असुन कुठे गिटटी,चुरी आणि कार्पेट चा वापर केलेला आहे. कुठे कार्पेटचाच वापर केलेला आहे तर कुठे रोडचे काम अर्धवट सोडले आहे. याकडे अधिकारी आणि आमदार यांचे लक्ष नाही.

 

अधिकारी आणि ठेकेदार यांची मिरोड भष्टाचार, नयकुंड ते बखरी रोडवर निष्कृष्ट दर्जाचे काम, आमदार आशिष जैस्वाल यांच्या निधीतून होते , रोडचे कामात मोठा भ्रष्टाचार उघडकीस,लीभगत असल्यामुळे अधिकारी यांनी ठेकेदारांचे बिल काढुन आपले कमीशन (मलाई) घेऊन मोकळे झाले. पण रोडचे काम नियमानुसार झाले किंवा नाही याकडे यांचे लक्ष नाही. रोडचे जेव्हा काम झाले तेव्हा पासून रोड उखरणे चालू झाले पण ह्या रोड वरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुक नाही तरीसुद्धा रोडचे आताच बेहाल झालेले आहेत.

पण शासनाचे कर्मचारी रोडचे काम पाहण्या ठेवलेले असतात तेही आपले कमीशन घेऊन मोकळे होतात, म्हणून वरिष्ठ अधिकारी यांनी ह्या रोडची ताबडतोब चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या वरती कार्यवाही करण्याची मागणी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांनी केलेली आहे.

प्रतिनिधी सतीश साकोरे-पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या