kanhan येथे सिलेंडरला आग लागुन आगीचा भपका! महिला गंभीर जख्मी |
सिलेंडर ला आग लागुन आगीचा भपका उडाल्याने महिला गंभीर जख्मी, उपचारार्थ दाखल
kanhan येथे सिलेंडरला आग लागुन आगीचा भपका! महिला गंभीर जख्मी | kanhan yethe cylender la aag lagun agicha bhapka | eak mahila gambhir jakhami |
कन्हान – कन्हान शहरातील रामनगर गुरफुडे ले आऊट येथील रहिवासी माजी सैनिक अरविंद बोरकुटे यांचा घरातील गँस सिलेंडर ला अचानक आग लागुण आगीचा भपका उडाल्याने त्यांचा पत्नी सुषमा बोरकुटे गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार दिनांक.१९ ऑक्टोंबर ला सायंकाळी ७.३० वाजता च्या दरम्यान अरविंद बोरकुटे यांचा पत्नी सौ.सुषमा अरविंद बोरकुटे या स्वयंपाक घरात स्वयंपाक करित असतांना अचानक गँस च्या सिलेंडर ला आग लागुन आगीचा भपका उडाल्याने सुषमा बोरकुटे यांचा चेहरा, हात व डोक्याचे केस जळुन गंभीर जख्मी झाल्याने आजुबाजुच्या लोकांनी धाव घेऊन बोरे, रेती व पाणी टाकुन आगीवर नियंत्रण मिळवुन गंभीर जख्मी महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांना मिळताच त्यांनी स्टाॅपसह घटनास्थळी भेट देऊण पाहणी केली.
गँस कम्पनी व्दारे घरोघरी गँस सिंलेंडर विकत दिले असुन सिलेंडर च्या रूपात बॉम्बच दिला आहे. परंतु दर महिन्याला विकत घेणाऱ्या या सिंलेंडर ची सुरक्षे च्या दृष्टीने पाहिजे तश्या उपाय योजना च्या अभावा मुळे अश्या दुर्घटनेस होऊन निर्दोष लोक बळी पडतात. यामुळे गँस कम्पनी ने सर्व गँस ग्राहकांचा विमा उतरविण्यात यावा, सिलेंडर ची योग्य तपासणी करून ग्राहकांना सिलेंडर विक्री करण्यात यावे आणि सिलेंडर ला आग लागुन गंभीर जख्मी झालेल्या महिलेला योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या