Advertisement

Breaking News भरदिवसा बोर्डा चौरस्ता जवळील बस स्टॉप वर होमगार्ड शिपाई युवकाची निघृण हत्या | breking news | bhar diwsa chaurasta jawalil bas stop jawal homegard shipai yuwkachi nirghun hatya |

Breaking News भरदिवसा बोर्डा चौरस्ता जवळील बस स्टॉप वर होमगार्ड शिपाई युवकाची निघृण हत्या

Breaking News भरदिवसा बोर्डा चौरस्ता जवळील बस स्टॉप वर होमगार्ड शिपाई युवकाची निघृण हत्या | breking news | bhar diwsa chaurasta jawalil bas stop jawal homegard shipai yuwkachi nirghun hatya |

आरोपी पसार, बालाघाट मध्ये आढळला मृतदेह, कन्हान पोलीस व स्थानीय गुन्हे शाखा पोलीस द्वारे पुढील तपास सुरु

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गा वरील बोर्डा चौरस्ता जवळील बस स्टॉप वर पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन भरदिवसा होमगार्ड शिपाई आशिष पाटील या युवकाची निघृण हत्या केल्याची थर्रारक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार आरोपी कृणाल नाईक याचा पत्नीशी होमगार्ड शिपाई मृतक आशिष पाटील वय २७ वर्ष राहणार न्यु गोंडेगाव कन्हान याचे अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मंगळवार दिनांक १० आॅक्टोंबर ला दुपारी १२ ते १ वाजता च्या दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील बोर्डा चौरस्ता जवळील बस स्टॉप वर आरोपी कृणाल नाईक याने आशिष पाटील ला बोलावुन दोन ते तीन मित्रा च्या सहकार्याने भरदिवसा धारदार शस्त्राने आणि हाॅकी स्टिक ने मारुन हत्या केली.

सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते आपल्या स्टाॅप सह घटनास्थळा वर पोहचुन पाहणी केली असता रक्ताचे ओलसर डाग मो

ठ्या प्रमाणात दिसुन आल्याने पोलीसांनी पंचनामा करुन घटना गंभीर्याने घेत अधिक तपास सुरु केला.

तपास सुरु केलाअसता तपासा दरम्यान आरोपीतांनी पुरवा नष्ट करण्याचा उद्देशाने एम एच ३१ सी एन ६२४० या चारचाकी वाहनात आशिष चा मृतदेह टाकुन तिरोडी कटंगी जिल्हा बालाघाट ला घेऊन गेल्याचे पोलीसांना समजले.

कन्हान पोलीसांनी लगेच माहिती बालघाट पोलीसांना दिली असता पोलीसांना शोध कार्य दरम्यान आरोपीचे वाहन रस्त्यावर दिसुन आल्याने पोलीसांनी वाहनाची पाहणी केली असता त्या मध्ये आशिष पाटील चा मृतदेह आढळुन आला. वाहन पंचर झाल्याने आरोपी वाहन आणि मृतदेह सोडुन पसार झाले.

बालाघाट पोलीसांनी आशिष पाटील च्या नातेवाईकांना व कन्हान पोलीसांना कळविल्याने नातेवाईक घटनास्थळा वर कालच रवाना झाले. बातमी लिहे पर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही.

https://youtu.be/NtpPxK_5lmY

सरद घटना गंभीर्याने घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, स्थानिक गु्न्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक सीबी चव्हाण, सहायक फौजदार खुशाल रामटेके, पोलीस हवालदार जैलाल सहारे, मुदस्सर जमाल, अमोल नागरे, नवीन पाटील, अश्विन गजभिए, हरिष सोनभद्रे सह स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक आणि तपास यंत्रना अधिक सक्रिय करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या