Advertisement

शिवशक्ती हनुमान मंदिर येथे श्रावण सरीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न |shrawan saricha karykram utsahat sajara |

शिवशक्ती हनुमान मंदिर येथे श्रावण सरीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवशक्ती हनुमान मंदिर येथे श्रावण सरीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न | shrawan saricha karykram utsahat sajara |

नागपुर – शक्ती माता माऊली ग्रुप द्वारे श्रावण महिन्या निमित्य शिवशक्ती हनुमान मंदिर येथे श्रावण सरिचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेविका सविता चकोले, प्रमुख अतिथी उपमहापौर मनीषाताई धावडे, मंदाकिनी बालपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कविता रेवतकर यांनी केले होते.

कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा, फुलांचे दागिने, विविध प्रकारचे गेम्स व क्यूज अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषा मध्ये रजनीताई गंघारे व नेहा बनते यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मनीषा नवघरे व तृतीय क्रमांक मेगा सोनटक्के यांनी पटकावला.

तसेच ग्रीन क्वीन मध्ये रचनाताई घाटोळे व 65 वर्षाच्या प्रभा पटे यांनी पटकाविला. वेशभूषा आणि श्रावणी क्वीन पाहुण्यांनी डोक्यावर टियारा घालून दिले एका मिनिटात सहा गाणे म्हणणाऱ्या अंजली खोपे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

भारतीय संस्कृती तर कोणी उखाणे घेऊन नंबर पटकविला. शक्ती माता माऊली ग्रुप कविताई रेवतकर यांचे असून नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता गंगारेताई सरोदे, दिपाली भोयर, वनिता गिरीपुंजे, मेघा सोनटक्के निता अडसुळे, अंजू भटकनागर, दीप्ती चरडे, वंदना बारापात्रे सह आदि महिलांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

शिवशक्ती हनुमान मंदिर येथे | श्रावण सरीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न |shrawan saricha karykram utsahat sajara |

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या