Advertisement

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करुन न्याय देण्याची मागणी | shetakrichi faswnuk karnarya aropila | tatkal atak karun | shetkari yanna |nyay denyachi magani |

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करुन न्याय देण्याची मागणी

भाजपा पदाधिकार्यांचे उपविभागीय अधिकारी रामटेक यांचा मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करुन न्याय देण्याची मागणी | shetakrichi faswnuk karnarya aropila | tatkal atak karun | shetkari yanna |nyay denyachi magani |

कन्हान – रामटेक, पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील १५० शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या कर्जामध्ये फसवणूक करणारी बातमी मागील एक सप्ताह पासून विविध प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये प्रकाशित झाली आहे. मौदा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध बुधवार (दि.३०) आॅगस्ट ला गुन्हा दाखल झाला असुन पोलीसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

महाराष्ट्र शासनाने सदर प्रकरणा कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत करुन बँक कर्जा मध्ये फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करुन शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे करावे अशी मागणी भाजपा पदाधिकार्यांनी माजी आमदार श्री मल्लीकार्जुन रेड्डी, पंचायत समिती सभापती व रामटेक तालुकाध्यक्ष नरेंद्र बंधाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांचा नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सवरंगपते रामटेक यांचा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन केली आहे.

या प्रसंगी संजय मुलमुले, दिलीप देशमुख, लक्ष्मण केने, सतीश डोंगरे, रिंकेश चवरे, नंदकिशोर कोहळे, उमेश कुंभलकर, रामानंद अडामे, वसंता कोकोटे, संजय बिसमोगरे, करीम मालाधारी, आलोक मानकर, सुखदेव शेंद्रे, सुधीर अवस्थी, गुरुदेव चकोले, शिवाजी चकोले,अजय शेंद्रे, गौरीशंकर गयगये सह आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या