Advertisement

लोखंडी खांबाला युवकाने दुपट्याने गळफास लावुन केली आत्महत्या | lokhandi khambala yuvakane dupatayane galphas lavun kelly suicide |

लोखंडी खांबाला युवकाने दुपट्याने गळफास लावुन केली आत्महत्या | lokhandi khambala yuvakane dupatayane galphas lavun kelly suicide

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट-पिपरी रोड चे बाजुला घराच्या सिमेंटसिटच्या आडव्या लोखंडी खांबाला सौरभ राऊत या युवकाने दुपट्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.२) सप्टेंबर ला रात्री १० वाजता मृतक युवक सौरभ तुलसी राऊत हा घरी गेला. तेव्हा सौरभ भरपुर दारू पिऊन होता. थोडा वेळ थांबुन सौरभ घरा बाहेर निघुन गेला.

रविवार (दि.३) सप्टेंबर ला सकाळी ६ वाजता तुलसी कवडु राऊत वय ५३ वर्ष रा.गाडेघाट रोड पिपरी वार्ड क्र.६ कन्हान हे आपल्या घरी झोपुन असतांना वस्तीतील राकेश गणेश मेश्राम हा घरी आला व त्यांनी सांगितले की तुमचा मुलगा सौरभ ने आकाश माहातो चे खुल्या घराच्या सिमेंटसिटचे आडव्या लोखड़ी खांबाला गळफास लावला आहे.

अश्या माहितीने तुलसी राऊत व घरच्या लोकांनी जाऊन पाहीले असता सौरभ हा सिमेंटसिटच्या आडव्या लोखंडी खांबास दुपटयाने गळफास लावुन लटकलेला अवस्थेत दिसुन आल्याने त्यास हात लावुन बघितले तर तो मरण पावला होता.

सदर घटनेची माहिती तुलसी राऊत यांनी कन्हान पोलीसांना दिली असता पोलीस हवालदार जयलाल सहारे, आशिक कुंभरे यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

सौरभ हा जास्त दारू पिण्याचा सवईचा असुन तो जास्त घरी राहत नव्हता दारूच्या नशेत त्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी तुलसी राऊत यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करित आहे.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या