श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे शिवपिंड ची स्थापना
श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री येथे शिवपिंड ची स्थापना | hanuman mandir deosthan khadan road kandri yethe shivpindachi sthapana
कन्हान – श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री-कन्हान येथे श्रावण महिन्याचे औचित्य साधुन शिवपिंड व नंदीबैल मुर्तीची स्थापना करण्यात आली.
पावन श्रावण महिन्याचे औचित्य साधुन श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री-कन्हान येथे सकाळी ९ वाजता मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून कवडु महादेव आखरे यांचा प्रमुख उपस्थितीत सौ.सुधा पुरुषोत्तम आखरे, विद्या विजय आखरे यांच्या हस्ते शिवपिंड व नंदीबैल मुर्तीची स्थापना करण्यात आली. दुपारी १२ ते ६ वाजता पर्यंत सौ. मालुताई वांढरे, रेखा कामडे, उज्वला पोटभरे, मनिषा वाडीभस्मे, सुनिता हिवरकर, माधुरी चकोले, मंगला कामडे, ऊषा वंजारी, ऊषा वाडीभस्मे, आयुष आखरे, संदिप कापसे, खुशाल चाफले, प्रविण आखरे, आनंद देशमुख, प्रदिप आखरे, विष्णु सरोदे, उदयभान विश्वकर्मा, गोलु वांढरे, देवराव आखरे, लक्ष्मण हिवरकर, आदी भजन मंडळा च्या शिव भक्तानी सुंदरकांड, रामायण आणि भजन गायन करित धार्मिक वातावरणाची निर्मिती केली.
सायंकाळी विजय कवडुजी आखरे यांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थानी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, कवडु आखरे, झिबल सरोदे, महेंद्रबाबु पलिये, वासुदेव आकरे,अतुल हजारे, खुरामा हिवरकर, उदयभान विश्वकर्मा, नरेश पोटभरे, दिनबा ठाकरे, मनोज कश्यप, सुनिल प्रजापती, शिवाजी चकोले, हेमा आंबाळकर, फजित बावने, सुरेंद्र पोटभरे, वासुदेव आखरे, प्रशांत आखरे, देवराव आखरे, विक्की नांदुरकर, लक्ष्मण सोनकुसरे, सौ उज्वला पोटभरे, रत्ना आखरे, इंदिरा मसुंंहरे, योगेश विश्वकर्मा, प्रशांत देशमुख, संदिप कापसे, भगवान चकोले, शैलेश हिंगे, सतिश समशेर, संकेत चकोले, ऊमेश वाडीभस्मे, सुरेश वाडीभस्मे, सेवक भोंदे, राजेश पोटभरे, धनराज क्षिरसागर सह मोठया संख्येने भाविक शिवभक्त उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या