Advertisement

काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेत जुन्या पेंन्शन ची मागणी | congress jansanwad yatret junya oensha chi magani | जुन्या पेंन्शन ची मागणी | juni penshaon magani |

काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेत जुन्या पेंन्शन ची मागणी

जुनी पेन्शन लढ्यातील शिक्षकांचे प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांना निवेदन

कन्हान:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी च्या संकल्पनेतुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधण्याच्या सुरु केलेल्या ‘जन संवाद यात्रेत’ जुनी पेन्शन चा नारा गुंजला.

कन्हान तारसा चौक येथे शुक्रवार ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमेटी चे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा पोहचली असता उपस्थित शिक्षक कर्मचाऱ्यां तर्फे विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपुर विभागीय सचिव खिमेश बढिये, माधव काटोके यांचा नेतृत्वात एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देण्यात आला.

त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी जुनी पेन्शन लढ्यातील शिलेदारांना बोलावुन त्यांच्या सोबत जुनी पेंन्शन च्या मागणीवर चर्चा केली. काॅगेस पक्षाने ज्या प्रकारे इतर राज्यात जुनी पेन्शन लागु केली तशीच महाराष्ट्रात सत्ता आल्या वर लागु करु असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी दिले.

या प्रसंगी माधव काटोके, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपुर विभागीय सचिव मा.खिमेश बढिये, जिल्हा संघटक मा.राजेंद्र खंडाईत, ग्रामीण जिल्हा संघटक मा.गणेश खोब्रागडे, महिला संघटिका सौ.प्रणाली रंगारी, मा. अमित मेंघरे, पारशिवनी तालुका संघटक मा.जितेंद्र भांडेकर, संजय डहाके, सतीश कुथे, विलास उईके, ज्ञानेश्वर कामडी, गौरीशंकर साठवणे, नरेश तेलकापल्लीवार, किशोर जिभकाटे, राजु भस्मे, भिमराव शिंदे मेश्राम, दिनेश ढगे, एस. एस.बेलनकर, प्रशांत वैद्य, सौ विशाखा ठमके, सौ गीता वंजारी, अभिषेक मोहनकर, भास्कर सातपुते, सौ आयशा अंसारी, ज्ञानप्रकाश यादव, श्रीकांत पेटकर, सौ.लता पेटकर, कु.रुपाली उके, कु.वनिता घोडेस्वार, हरिहर डहारे, संजय आहाके, सुभाष मदनकर, रविकांत गेडाम यांच्या सह अनेक जुनी पेन्शन लढ्यातील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या