Advertisement

भाजपा नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार

भाजपा नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार

ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी रामभाऊ दिवटे, तालुका अध्यक्षपदी योगेश वाडीभस्मे यांची नियुक्ती

कन्हान – भाजप जिल्हा ग्रामीण ची कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहले यांनी नुकतीच घोषित केली असुन सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा भाजपा कन्हान शहर द्वारे सत्कार करण्यात आला.

या नवनियुक्त कार्यकारणी मध्ये नागपुर जिल्हा ग्रामीण ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी रामभाऊ दिवटे, पारशिवनी तालुका अध्यक्ष पदी योगेश वाड़ीभस्मे, जिल्हा ग्रामीण महामंत्री पदी रिंकेश चवरे, जिल्हा ग्रामीण मंत्री पदी सौ.शालिनीताई बर्वे, नागपुर जिल्हा ग्रामीण मंत्री पदी अतुल हजारे यांची निवड करण्यात आली.

भाजपा कन्हान शहर द्वारे रामभाऊ दिवटे यांचा जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचा अध्यक्षतेखाली, शहर अध्यक्ष डाॅ मनोहर पाठक यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये नवनियुक्त पदाधिकार्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सर्व कार्यकर्त्यांना आपसी मतभेद भुलवुन संघटनेचे काम करण्याचे आव्हान केले. तसेच तालुका अध्यक्ष योगेश   वाड़ीभस्मे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सरल ऐप डाउनलोड करण्याचे व 9090902024 वर मिस कॉल करण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी केले तर आभार तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके यांनी मानले.

या प्रसंगी लिलाधर बर्वे, विनोद किरपान, मनोज कुरडकर, गुरूदेव चकोले, शिवजी चकोले, महेंद्र साबरे, उमेश कुंभलकर, मयुर माटे, संजय रंगारी, कामेश्वर शर्मा, सुषमा चोपकर, अनिता पाटिल, तुलेशा नानवटकर, सुनंदा दिवटे, सुषमा मस्के, प्रतीक्षा चवरे, संजय चोपकर, सौरभ पोटभरे, सचिन वासनिक, आकाश वाडणकर, देवेंद्र सेंगर, अमन घोडेस्वार, चक्रधर आकरे, विलास चाफले, संजय कात्यायनी, सुशील ठाकरे, रोशन बाळबूधे, चंद्रगुप्त पानतावने, चंद्रकांत बावने, राहुल वानखेडे सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या