Advertisement

आदर्श हायस्कुल शाळा कन्हान येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा | adarsh high school-kanhan | shikshk diwas utsahat sajara |

आदर्श हायस्कुल शाळा कन्हान येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा

आदर्श हायस्कुल शाळा कन्हान येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा | adarsh high school-kanhan | shikshk diwas utsahat sajara |

कन्हान: – आर्दश हायस्कुल कन्हान व आइडिएल काॅन्वेंट हिंदी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपति डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३५ व्या जयंती चे औचित्य साधुन शिक्षक दिवस कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळा संस्थेचे अध्यक्ष सौ.पुष्पा त्रिवेदी, सचिव मा.भरत सावळे, शाळेचे मुख्याध्यापक मा.जी.डी यादव यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी शाळा संस्थेचे सहसचिव सौ.एन.डी.मेश्राम, हिंदी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता देशमुख, सदस्य व माजी शिक्षिका सौ.छाया मिसार यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चिरित्र्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर विद्यार्थांनी खेळ, नृत्य प्रस्तुत करुन आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या भावना कवितांमधून व्यक्त केल्या. मान्यवरांचा हस्ते सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांना डायरी, पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन शिक्षक दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका सौ.पुजा तिवारी यांनी केले तर आभार विजया भस्मे यांनी मानले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या