मनसे तर्फे गटविकास अधिकारी प.स.रामटेक यांना दिले निवेदन | ग्रामपंचायत मनसर येथे ग्राम विकास अधिकाऱ्यांची जागा रिक्त |
मनसे तर्फे गटविकास अधिकारी प.स.रामटेक यांना दिले निवेदन
रामटेक:- पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणारी ग्रामपंचायत मनसर ही लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते.
या ग्रामपंचायतीचा कार्यालयीन कारभार योग्यरीतीने चालावा यासाठी ग्रामपंचायत स्थरावर ग्राम विकास अधिकारी नेमण्यात येत असतो. मात्र या ठिकाणी अनेक दिवसांपासून ग्राम विकास अधिकाऱ्यांची जागा रिक्त असल्याची चर्चा होती.
तात्पुरती सेवा देण्यासाठी सचिव मुकुंदा मरस्कोल्हे यांना त्याठिकाणी नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांच्याकडे दुसऱ्या ग्रामपंचायतीचा ही कार्यभार असल्याने आवश्यक तो वेळ मनसर ग्रामपंचायतीला देवु शकत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो.
तात्पुरते असलेले सचिव मुकुंदा मरस्कोल्हे यांची सामान्य नागरिकांसोबत ची वागणूक खूप त्रास दायक आहे सामान्य माणसाची त्यांचा नजरेत काही किंमत नाही ग्राम पंचायत मध्ये आपल्या समस्या घेऊन आलेल्या सामान्य जनते शी उद्घटपणे बोलतात.
अशी माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे रामटेक तालुका उपाध्यक्ष राकेश (रॉकी) चवरे यांच्या मार्गदर्शनात. गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांना मनसर ग्रामपंचायत कार्यालयात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी विक्की धुर्वे, आशिष बोरीकर, मयूर तळेगावकर,हर्ष ढगे, मुकेश भोंडेकर, निखिल धुर्वे उपस्थित होते
प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम-रामटेक तालुका
0 टिप्पण्या