Advertisement

ब्रेकिंग न्यूज नवेगांव खैरी पेच धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटर ने उघडले | नवेगांव खैरी पेच धरण | दोन दरवाजे उघडले |

ब्रेकिंग न्यूज नवेगांव खैरी पेच धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटर ने उघडले | नवेगांव खैरी पेच धरण | दोन दरवाजे उघडले |

| ब्रेकिंग न्यूज | नवेगांव खैरी पेच | धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटर ने उघडले

पेंच व कन्हान नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

उपविभागीय अभियंता एन एस सावरकर यांचे नागरिकांना आव्हाहन

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज बुधवार ला सकाळी ६ वाजता पर्यंत धरणात एकुण १०० % टक्के जलसाठा झाल्याने धरणाचे दोन गेट उघडण्यात आले आहे.

मध्यप्रदेशात मागील काही दिवसान सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे गेट उघडल्याने तोतलाडोह व पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज बुधवार (दि.९) ला सकाळी ६.०० वाजता पर्यंत पेंच धरणात एकुण १००% टक्के जलसाठा झाल्याने धरणाचे दोन गेट ०.१५ मीटर ने उघडण्यात आले असुन ३१.६८४ क्युमेक पानी पेंच व कन्हान नदी पात्रात सोडण्यात आले आहे. सोडणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकते.

त्यामुळे पेंच व कन्हान नदी पात्राच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वाढली असुन नागरिकांनी नदी पात्रा जवळ जाणे टाळावे, नदी काठच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत ची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्र ओलांडु नये, शेतीची अवजारे नदी पात्रात ठेऊ नये, जनावरांना नदी पात्र ओलांडु देऊ नये असे कडकडीचे आव्हाहन पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी उपविभागीय अभियंता एन एस सावरकर यांनी केले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या