नवेगांव खैरी पेंच धरणात ९७.९६ % टक्के जलसाठा काही तासात गेट उघडण्याची शक्यता
| नवेगांव खैरी | पेंच धरणात ९७.९६ % टक्के जलसाठा | काही तासात | गेट उघडण्याची शक्यता |
पेंच व कन्हान नदीकाठाच्या गावातील लोकांनी सावधगिरी बाळगावी
उपविभागीय अभियंता एन. एस.सावरकर यांचे नागरिकांना आव्हाहन
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज मंगळवार सकाळी ६ वाजता पर्यंत धरणात एकुण ९७.९६ % टक्के वाढ झाल्याने धरणाचे गेट उघडण्याची शक्यता वाढली आहे .
मध्यप्रदेशात सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे गेट उघडल्याने तोतलाडोह व पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज मंगळवार (दि.८) ला सकाळी ६.०० वाजता पर्यंत पेंच धरणात एकुण ९७.९६ टक्के वाढ झाली आहे .
नवेगाव खैरी पेंच धरणाच्या मंजुर परिचलन आराखड्या नुसार १ ऑगस्ट पर्यंत १०० % पाणीसाठा प्रस्तावित आहे . धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या काही तासात जलसाठ्यात वाढ झाल्यास पाणी नदी पात्रात सोडावे लागेल . त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे .
तेव्हा पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांनी सावधगीरी बाळगावी असे कडकडीचे आव्हाहन पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी उपविभागीय अभियंता एन. एस.सावरकर यांनी नागरिकांना केले आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या