Advertisement

देवलापार मध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी

देवलापार मध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी

देवलापार:- दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीच्या अनोख्या प्रकाराने देवलापार मधील वृद्ध महिलांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. यात चोराने अनोखी पद्धत वापरल्याने आजुबाजूच्या उभ्या असलेल्या व पाहत असलेल्या लोकांना सुद्धा जरासाही संशय आला नाही की समोर चोर उभे आहेत.

प्राप्त माहीती नुसार नित्य नेमाने पूजापाठ करणाऱ्या देवलापार निवासी मिराबाई रामसेवक गुप्ता वय 67 हया शनिवार दिनांक 19 ऑगष्ट 2023 रोजी त्यांच्या निवास स्थानापासुन महज 200 मीटर अंतरावर असलेल्या दुर्गा मंदिरात जाण्याकरीता सकाळी 8.30 मिनिटांनी निघाल्या.

रस्त्यात पुजेकरीता झाडावरील फुले तोडत असता अचानक दोन बाईक वर तिन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आलेत ते रेनकोट घालुन होते. एकाने हेलमेट घातला होता. थोड्या वेळाकरीता त्याने हेलमेट बाजुला काढून ठेवला. त्याने मिराबाई च्या पायाला स्पर्श करीत आशीर्वाद घेतला. एक व्यक्ती मिराबाई सोबत बोलत होता तर दुसऱ्याने मिराबाई च्या कानात सांगीतले की चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत त्यामुळे आपल्या गळ्यातील सोन्याची चैन तुम्ही काढून मला द्या मी ती चैन तुमच्या पदराला बांधून देतो.

त्याच्या म्हणण्यानुसार मिराबाईने सोन्याची 20 ग्रॅम ची चैन अंदाजे एक लाख रुपये असलेली गळ्यातून काढून त्याच्या हवाले केली. त्याने ती चैन मिराबाई च्या पदरात गाठ बांधुन दिली. हा सर्व प्रकार आजुबाजुला उपस्थित लोक उघड्या डोळ्यांनी बघत होते परंतु त्यांना कोणालाही संशय आला नाही की ते चोर आहेत.

थोड्याच वेळात अज्ञात चोर निघून गेले व मिराबाई मंदिरात पुजापाठ करण्याकरीता गेली. पूजापाठ झाल्यानंतर तिने पदराची गाठ सोडली तर त्यात दगड आढळुन आलेत. आपली फसवणुक झालेली आहे हे तिच्या लक्षात आले ती धावतच घटनास्थळी गेली तोपर्यंत चोर पसार झाले होते.

घडलेली घटन वाऱ्यासारखी गावात पसरली त्यांच्या घरासमोर गर्दी जमली त्यातील काहींनी बाईक घेवून देवलापार मध्ये चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळाले नाहीत.

घटनेची जानकारी मिराबाईंनी परीवाराला दिली. परिवारांनी लगेच देवलापार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. सदर घटना ग्रामपंचायत च्या सिसीटिव्ही तसेच दुर्गामांदिरात असलेल्या सिसिटिवी मध्ये रिकार्ड झाली आहे. त्या फुटेज च्या आधारे देवलापार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश मेश्राम व त्यांची चमु अज्ञात चोरांचा शोध घेत आहे.

रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या