Advertisement

चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडले | तोतलाडोह आणि पेंच धरणाचा जलसाठा वाढतोय |

चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडले | तोतलाडोह | आणि | पेंच |धरणाचा जलसाठा वाढतोय |

काही तासात पेंच व कन्हान नदीत केव्हा ही पाणी सोडण्यात येऊ शकते- एन.एस.सावरकर

कन्हान – मध्य प्रदेशात होत असलेल्या पावसाने चौराई धरणाचा जलसाठा वाढुन दोन दरवाजे शनिवार ला दुपारी उघडल्याने तोतलाडोह व पेंच धरणाचा जलसाठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा नदीत विसर्ग करावा लागु शकतो म्हणुन केव्हा ही पेंच व कन्हान नदी पात्रात धरणाचे पाणी सोडल्या जावु शकते. करिता नदी काठा लगत गावकऱ्यांनी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे कडकडीचे आवाहन करण्यात आले आहे.

रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात या वर्षी मानसुन उशिरा आला असुन सध्याच्या परिस्थितीत अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. मागील जुन महिन्यात पावसाचा जोर नाहीसा होता. जुलै महिन्यात थोडा फार पाऊस झाला. काही दिवसापुर्वी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पारशिवनी तालुक्यात १४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुरवार ला सुद्धा पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने विश्राम घेतला आहे. मध्यप्रदेशात सतत अधुन मधुन होत असलेल्या पावसाने चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने तोतलाडोह धरणाचा जल साठ्यात वाढ झाली आहे. काही दिवसापुर्वी तोतलाडोह धरणा चे काही दरवाजे उघडल्याने नवेगांव खैरी पेच धरणात पाण्याचा जलसाठा वाढला आहे. शुक्रवार (दि.४) ऑगस्ट ला सकाळी ११:00 वाजता मध्यप्रदेश च्या चौराई धरणाचे दोन दरवाजे ०.९० मी व दोन दरवाजे ०.३० मी ने उघडले असुन त्यातुन ५७२.२८ क्युमेक्स विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात वाढ झाली आहे.

शनिवार (दि.५) ऑगस्ट ला दुपारी पुन्हा मध्य प्रदेश च्या चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात वाढ होत आहे अशी माहिती धरणाचे अधिकारी अजय शेलार यांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत तोतलाडोह धरणात ८४ टक्के आणि नवेगाव खैरी पेंच प्रकल्प धरणात ९० टक्के पेक्षा जास्त जलसाठा असुन दोन्ही धरणात जलसाठा वाढत असल्याने धरण सुस्थीतीत व नियंत्रणा करीता आज रात्री किंवा उद्या (दि.६) ला आवश्यकते नुसार तोतलाडोह धरणाचे ०२ वक्रद्वार (गेट) उघडण्यात येऊन पेंच व कन्हान नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येईल.

सोडणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदी पात्राजवळ जाणे टाळावे. नदी काठाच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितानी स्वतःची काळ जी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्र ओलांडु नये, शेतीची अवजारे नदी पात्रात ठेवु नये, जनावरांना नदी पात्र ओलांडु देऊ नये अशी सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे कडकडीचे आवाहन पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी उपविभागीय अभियंता मा.एन.एस.सावरकर यांनी केले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या