जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवसाचे औचित्य साधुन केले वृक्षारोपण
एकतरी वृक्षरोपन करून वृक्षाचे संवर्धन केले पाहीजे-रिंकेश चवरे
कन्हान-जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिनाचे औचित्य साधुन समता सांस्कृतिक व शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था कन्हान व्दारे नगरपरिषद प्रागंणात, जि.प शाळा कन्हान आणि शांतीघाट (हरदास घाट ) कन्हान येथे आंबा, कडुनिंब, करंजी, गुलमोहर, सिताफळा सह इतर वुक्षरोपाचे वृक्षरोपन करण्यात आले.
मूलनिवासी दिवस जो वृक्षाचे संवर्धन करणे, निसर्गाची जतन करून प्राकृतिक वसुंधरेच्या रक्षणार्थ वृक्षारोपण करणे हे आज च्या काळाची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतआपली जवाबदारी लक्षात घेत एकतरी वृक्षरोपन करून वृक्षाचे संवर्धन केले पाहीजे असे या प्रसंगी आवाहान समता सांस्कृतिक व शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था कन्हान चे अध्यक्ष रीकेंश चवरे यांनी केले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र बाबु रंगारी, गट नेते राजेंद्र शेंदरे, नगरसेवक राजेश यादव, नगरसेविका संगिता खोब्रागडे, गुंफा तिडके, कल्पना नितनवरे, सुषमा चोपकर, वंदना कुरडकर, अनिता पाटील, वर्षा लोंढे, रेखा टोहणे, प्रतिक्षा चवरे, प्रिया रामटेके सह समता सांस्कृतिक व शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था कन्हान चे सदस्य सतिश भसारकर, लक्की चावला, विकास गुप्ता, मनिष सिडाम, राजेंद्र फूलझेले, मनोज मेश्राम, शरद वाटकर, शेषराव बावने, शालिकराम महाजन, विजय खडसे, आतिश मानवाटकर, सयंम गेडाम, दीपक कुंभारे, अजय लोंढे, मनोज कुरडकर, नगरपरिषद पदाधिकारी गण, जिल्हा परिषद शिक्षक वृंद, सम्मानित नगरवासी आणि समता सांस्कृतिक व शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था कन्हान चे सर्व सदस्य उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि-ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या