समृध्दी महामार्गावर गर्डर बसवताना भीषण दुर्घटना: दुर्घटनेत 17-कामगारांचा मृत्यू तर 3 जखमी
ठाणे:- शहापूर तालुक्यात मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाचे अंतिम टप्याचे काम सुरू असतानाच गर्डर लॉन्चरसह गर्डर काम करणाऱ्या कामगार कोसळले असून या भीषण दुर्घटनेत आतापर्यत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जखमी गंभीर असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गपासून ५ ते ६ किलोमीटर ग्रामीण भागात असलेल्या सरलांबे गावच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काल रात्री ११:00 वाजल्याच्या सुमारास १७ कामगार आणि९ इंजिनियर उपस्थितीत काम सुरू असतानाच अचानक लॉन्चरसह गर्डर काम करणाऱ्या कामगार कोसळले होते.
या घटनेची माहिती मिळताच सर्वांआधी स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन टीम ,समृद्धी कामगारानी मिळून क्रेनच्या साह्याने गर्डर खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढले असून अजूनही ४ ते ५ कामगार गर्डर खाली दबले असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्यापही बचावकार्य सुरू असून पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल् असून आतापर्यत 17 कामगारांचे मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केले आहे.
आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ५ साईड इंजिनियर तर 12 कामगारांचा समावेश आहे , ठाण्याहून NDRF ची टीम दाखल झाली.
प्रतिनिधी : राजेश भांगे मुरबाड-ठाणे
0 टिप्पण्या