वृक्षारोपण करुन साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
कन्हान-नागपुर जिल्हा ग्रामिण व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्य कांद्री, कन्हान, पारशिवनी, रामटेक येथे वृक्षरोपन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.१) ऑगस्ट ला लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य रामटेक विधानसभा अंतर्गत प्रमुख शहरात नागपुर जिल्हा ग्रामिण युवक काँग्रेस सचिव रोहित बर्वे व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील, युवा नेते अजय कापसिकर यांच्या नेतृत्वात सर्व प्रथम संताजी नगर कांद्री येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार व मानवंदना अर्पण करून परिसरात वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी कांद्री माजी सरपंच बलवंत पडोळे, सिंदु वाघमारे, महेश झोड़ावने, राहुल टेकाम, महेश बावनकुळे, जितेंद्र पांडे, सतिष भसारकर, महेश धोंगडे, दुर्गेश शेंद्ररे आदि सह युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर गांधी चौक कन्हान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कन्हान – पिपरी नगरपरिषद नगर परिषद च्या आवारात वृक्षरोपन करण्यात आले. या प्रसंगी नप उपाध्यक्ष योगेश बाबु रंगारी, नगरसेविका रेखाताई टोहने, अमोलभाऊ प्रसाद, सतिश भसारकर, महेश धोंगडे, चंदन मेश्राम, दिलीप निंबोणे, दुर्गेश शेंदरे, मयुर नागपुरे, शैलेश पात्रे, ठाकुर गायकवाड, वर्मा लोंढे, पिंटु गायकवाड सह युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पारशिवनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार मा.रणजित दुसावार, नायब तहसीलदार मा.प्रकाश हरकोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी पवन खंडाते, गौतम पाटील, महेश धोंगडे, दुर्गेश शेंद्रे, आदि युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
रामटेक येथे बस स्टाॅप समोर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार व आदाराजंली अर्पण करून परिसरात वृक्षरोपन करण्यात आले. या प्रसंगी कासिम शेख, महासचिव नागपुर जिल्हा युवक काँग्रेस अमन शेख, हासिम शेख, राम वाघमारे, अयान शेख, राज वानखेडे, हर्ष सांगोडे सह आदि युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
अश्या प्रकारे युवक काँग्रेस व्दारे वृक्ष रोपन करून साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या